Vande Bharat Express Timetable : मुंबई सोलापूर वंदेभरात एक्सप्रेस सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या ट्रेनच्या टाइमिंग आणि तिकीट दराबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई सोलापूर वंदे भारतच वेळापत्रक खालील प्रमाणे
सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी ही रेल्वे सुटेल 9 वाजता पुणे येथे पोहचेल आणि दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला म्हणजे मुंबईला पोहोचणार आहे. दरम्यान या रेल्वेच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर त्याच दिवशी सायंकाळी ही रेल्वे मुंबईहून सोलापूरच्या दिशेने निघेल.
सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी मुंबईहून निघाल्यानंतर सात वाजून 30 मिनिटांनी ही रेल्वे पुण्यात दाखल होईल अन मग रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही रेल्वे सोलापूरला पोहोचेल. दरम्यान मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही रेल्वे धावणार नाही. ही रेल्वे दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई सोलापूर वंदे भारत तिकीट दर खालीलप्रमाणे :-
या ट्रेनने एसी चेअर ने प्रवास केल्यास प्रतिकिलोमीटर दोन रुपये सोळा पैसे (एसी चेअर) इतके तिकिटाचे दर लागणार आहेत. तसेच एक्झिक्यूटिव्ह चेअर ने प्रवास केल्यास प्रति किलोमीटर चार रुपये 38 पैसे इतक भाड प्रवाशांना लागणार आहे.
म्हणजे सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना एसी चेअरसाठी ९८५ रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअरसाठी १९९३ रुपये तिकिटाचे दर असणार आहे. पुण्यासाठी तिकिटाचे दर ६८८ रुपये (एसी चेअर) असून एक्झिक्युटिव्ह चेअरसाठी १३८१ रुपये दर असणार आहे.