Vande Bharat Express Ticket Rate : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जात आहे. आतापर्यंत देशातील एकूण 25 मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे. आगामी काही महिन्यात देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे.
या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास जलद, गतिमान आणि आरामदायी झाला आहे. यामुळे प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसला अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. ही गाडी आपल्या आरामदायी आणि सुरक्षित प्रवासामुळे कमी वेळेतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र असे असले तरी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर इतर एक्सप्रेस गाड्यांपेक्षा अधिक आहे. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात जरी वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी देखील आता या गाडीची प्रवासी संख्या कमी झाली आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान पुणे ते मुंबईचा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करण्यासाठी रास्त दरात मासिक पासची उपलब्धता झाली तर प्रवाशांचा प्रवास अधिक फायदेशीर होईल आणि या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवासी संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.
जर मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेससाठी मासिक पासची सुविधा झाली तर मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना या निमित्ताने दिलासा मिळणार आहे. खरंतर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस समवेतच देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये दिवसेंदिवस प्रवासी संख्या कमी होत आहे.
देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 40% हून अधिक सीट रिकाम्या राहत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे या गाडीचे तिकीट दर. अशा परिस्थितीत या गाडीचे तिकीट दर कमी झाले तर प्रवासी संख्या वाढेल अशी आशा व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मासिक पासची उपलब्धता व्हावी अशी मागणी होत आहे. यामुळे आता याबाबत सकारात्मक निर्णय होतो का आणि या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मासिक पास सुरू होतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.