Vande Bharat Express : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या हाय स्पीड ट्रेनच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. दरम्यान याच हायस्पीड ट्रेन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर या गाडीचे नेटवर्क आता खूपच स्ट्रॉंग बनले आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस दिल्या असून यामुळे या गाड्यांची संख्या 51 वर पोहोचली आहे. सध्या 51 मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू असून आगामी काळात आणखी काही नवीन मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्राला लवकरच आणखी दोन नवीन वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे मार्गावर या दोन्ही गाड्या चालवल्या जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा या दोन मार्गांवर ही गाडी धावणार असा अंदाज आहे. यामुळे मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास जलद होणार आहे.
ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान सुरू केली जाणार आहे. दुसरीकडे पुण्याहून गुजरातला जाण्यासाठी पुणे ते वडोदरा ही गाडी सुरू होणार आहे. यामुळे पुणेकरांना जलद गतीने गुजरातला जाता येणार आहे.
सध्या महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत ?
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सध्या महाराष्ट्रात आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. यातील मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर नुकत्याच काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
यानुसार सध्या स्थितीला महाराष्ट्रात मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या आठ मार्गांवर सदर गाडीचे संचालन यशस्वीरित्या सुरू आहे.
थेट पुणे रेल्वे स्थानकावरून सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
सध्या स्थितीला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन सोलापूरला चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावत आहे. यामुळे पुणेकरांचा सोलापूरकडील आणि मुंबईकडील प्रवास जलद झाला आहे.
पण, थेट पुणे रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. मात्र पुणे ते वडोदरा ही गाडी सुरू झाली तर थेट पुणे रेल्वे स्थानकावरून देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
याबाबतचा निर्णय मात्र रेल्वे बोर्डाला घ्यायचा आहे. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की नाही हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.