Vande Bharat Express : देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेस च्या मोठ्या चर्चा रंगले आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलित, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त, आरामदायी आणि मध्यम जलदगती गाडी आहे. ही ट्रेन सध्या स्थितीला देशभरात एकूण दहा रूट वर धावत आहे. यापैकी चार ट्रेन आपल्या महाराष्ट्रात धावत आहेत. त्यात नुकत्याच मध्य रेल्वेच्या ताब्यात आलेल्या मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे.
खरं पाहता ही ट्रेन आपल्या गतिमान प्रवासासाठी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. अशातच मात्र मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन बाबत एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चक्क एक्सपायर झालेली बिस्किटे दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हे पण वाचा :- राज्य शासनाने म्हाडाच्या ‘त्या’ घराबद्दल घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! फडणवीस यांनी दिली विधिमंडळात माहिती
यासंदर्भात एका प्रवाशाने सोशल मीडियामध्ये व्हिडिओ सार्वजनिक केला आहे. तसेच या प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार देखील दाखल केली आहे. निश्चितच एकीकडे या ट्रेन बाबत सर्वत्र कौतुक केलं जात असतानाच या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या जीवाशी चाललेला हा खेळ रेल्वे प्रशासनाची किरकिरी करणारां आहे एवढे नक्की.
वास्तविक मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन मुळे प्रवाशांना मुंबई, पुणे, सोलापूर यादरम्यान प्रवास करतांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे. प्रवास गतिमान झाला आहे. परंतु या ट्रेनमध्ये दिली जाणारी खानपान सेवा प्रवाशांची जीवाशी खेळणारी आहे यामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप यावेळी पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! ‘या’ उच्च न्यायालयात निघाली मोठी भरती; पदवीधर उमेदवारांना आहे मोठा चॅन्स, वाचा सविस्तर
याबाबत अधिक माहिती अशी की, नागेश पवार नामक एका व्यक्तीने सोलापूर हुन मुंबईकडे वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास केला. या प्रवासात दरम्यान नागेश पवार यांना चहासोबत बिस्किटे ऑफर करण्यात आली. मात्र चहा बरोबर दिलेली ही बिस्किट एक्सपायर झालेली आढळली. हे पाहून सर्वप्रथम नागेश यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी ऑनलाईन रेल्वे प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे.
25 फेब्रुवारी 2023 रोजीच बिस्कीट एक्सपायर झाले होते मात्र तरी देखील नागेश पवार यांना ही बिस्किटे खाण्यासाठी देण्यात आली. यामुळे त्यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. आता यावर रेल्वे प्रशासनाकडून काय ऍक्शन घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- अभिमानास्पद ! वंदे भारत एक्सप्रेसच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा; आता ‘या’ जिल्ह्यात तयार होणार Vande Bharat Train