Vande Bharat Express : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. कोणत्याही शहरात सहजतेने रेल्वेने पोहोचता येत असल्याने रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन दाखल झाल्यापासून प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी देखील झाला आहे.
ही ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आहे. शिवाय या ट्रेनमध्ये असणाऱ्या वर्ल्ड क्लास सोयीसुविधा प्रवाशांना विशेष अट्रॅक्ट करत आहेत. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रत्येकालाच या गाडीने प्रवास करावा असे वाटते. हेच कारण आहे की गेल्या पाच वर्षांच्या काळात देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीच्या संचालन सुरू झाले आहे.
यापैकी दहा मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेस नुकत्याच सुरू झाल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातील आठ मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.
त्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळेल अशी शक्यता आहे. अशातच आता कर्नाटक आणि तामिळनाडू दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
भारतीय रेल्वे लवकरच कर्नाटकातील बेंगळुरू आणि तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली यांना जोडणारी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत असल्याची बातमी एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या पत्रानुसार, वंदे भारत लवकरच या मार्गावरील रुळांवर धावणार आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, तिरुचिरापल्ली रेल्वे विभागाकडून वंदे भारत गाड्या तिरुचिरापल्ली जंक्शन ते बेंगळुरू अप-डाउन एकाच दिवसात चालवण्याची विनंती करण्यात आली आहे.
त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते की नाही हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. तथापि, या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर या भागातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा जलद होणार आहे.
महाराष्ट्रालाही मिळणार नवीन वंदे भारत
सध्या महाराष्ट्रातील आठ महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. विशेष म्हणजे लवकरच पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते शेगाव, मुंबई ते शेगाव, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र याबाबत रेल्वे बोर्डाकडून तथा भारतीय रेल्वेकडून कोणतीच माहिती हाती आलेली नाही.