Vande Bharat Express : सध्या संपूर्ण देशात मध्य भारत एक्सप्रेसची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. या गाडीला प्रवाशांनी खूप चांगला प्रतिसाद दाखवला आहे. सध्या ही गाडी देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर धावत आहे. विशेष म्हणजे यापैकी बहुतांशी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे.
या 25 गाड्यांपैकी महाराष्ट्राला पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची भेट देण्यात आली आहे. तसेच आगामी काही महिन्यात राज्याला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगवेगळ्या आवृत्त्या देखील तयार केल्या जात आहेत.
स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसचे देखील निर्माणकार्य सूरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार या स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसचे निर्माण कार्य आयसीएफ चेन्नई अर्थातच इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे युद्ध पातळीवर सुरू आहे. ही गाडी मार्च 2024 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
यामुळे या गाडीला या चालू आर्थिक वर्षात सुरू केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. आयसीएफचे महाप्रबंधक बीजी माल्या यांनी ही माहिती दिली आहे. अर्थातच आता वंदे भारत एक्सप्रेस मधून देखील प्रवाशांना झोपून प्रवास करता येणार शक्य होणार आहे.
ही स्लीपर कोचवाली वंदे भारत एक्सप्रेस लांब पल्ल्याच्या रूटवर सुरू केली जाणार आहे. तसेच ही गाडी रात्रकालीन देखील राहणार आहे. बीजी माल्ल्या यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ICF वंदे भारत ट्रेन, वंदे मेट्रोचा नवीन प्रकार देखील विकसित करत आहे. वंदे मेट्रो ही १२ डब्यांची ट्रेन असेल आणि कमी अंतराच्या प्रवासासाठी तिचा वापर केला जाईल.
वंदे मेट्रो ट्रेन 100 किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या शहरांना कनेक्ट करण्याचे काम करणार असल्याची माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता ही ट्रेनही जानेवारी 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. निश्चितच स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेस आणि वंदे मेट्रो सुरू झाली तर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी होण्यास मदत मिळणार आहे.