Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होते.
यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही गाडी ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद होत आहे. ही गाडी खूपच सुरक्षित देखील आहे.
याशिवाय या ट्रेनमध्ये तुम्हाला अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा पाहायला मिळतात. हेच कारण आहे की अल्प कालावधीतच ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. आतापर्यंत देशातील 52 महत्त्वाचा मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यातील आठ गाड्या आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या आहे. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपूर तसेच नागपूर ते इंदूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान यातील मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता मुंबई ते जालना ही वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत चालवण्याची मागणी जोर धरत आहे. खरंतर मुंबई ते नांदेड या मार्गावर ज्यावेळी मुंबई ते जालना वंदे भारत सुरू झाली त्याचवेळी सुरू होणार होती.
पण विद्युतीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने ही गाडी फक्त मुंबई ते जालनापर्यंतचं सुरु करण्यात आली. केवळ विद्युतीकरणाअभावी जालना ते नांदेड वंदे भारत न सोडता जालना-मुंबई अशी सुरू करण्यात आली होती.
मात्र आता विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या गाडीचा विस्तार होणे अपेक्षित आहे. ही गाडी थेट नांदेड पर्यंत चालवली गेली पाहिजे अशी प्रवाशांची देखील मागणी आहे.
अशातच दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन आज नांदेडमध्ये येत आहेत. ते यावेळी रेल्वेच्या विभागीय कार्यालयास भेट देणार आहेत. यावेळी ते कार्यालयीन कामांची सुद्धा पाहणी करणार आहेत.
दरम्यान या भेटीदरम्यान दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रवाशांच्या या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. यामुळे मुंबई ते जालना दरम्यान सुरू असणारी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत धावणार का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
नक्कीच जर प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली तर मुंबई ते नांदेड दरम्यानचा प्रवास गतिमान होणार असून याचा मराठवाड्यातील नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे.