Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून भारतात वंदे भारत एक्सप्रेस याविषयी चर्चा पाहायला मिळत आहेत. ही गाडी नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. या गाडीमध्ये असणाऱ्या हायटेक सुविधा, या गाडीचा वेग यामुळे तर ही गाडी चर्चेत राहतेच शिवाय या गाडीसाठी अधिकचे तिकीट दर लागत असल्याने देखील या गाडीची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
दरम्यान, या गाडीचे तिकीट दर अधिक असले तरी देखील या गाडीची मोठी मागणी आहे. वेगवेगळ्या भागातील नागरिकांच्या माध्यमातून ही गाडी त्यांच्याकडे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
यासाठी नागरिकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात आहे. विशेष म्हणजे या गाडीची लोकप्रियता पाहता भारतीय रेल्वे देखील देशातील विविध मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर दुसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
अशातच काही मीडिया रिपोर्ट मध्ये देशातील आणखी सहा महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे.
आता आपण कोणत्या सहा मार्गांवर ही गाडी सुरू होऊ शकते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे मंत्रालयाने सहा वंदे भारत एक्स्प्रेसचे मार्ग जवळपास निश्चित केले आहेत.
यामध्ये दिल्ली ते कटरा, दिल्ली ते अयोध्या मार्गे लखनौ, दिल्ली ते चंदिगड, बेंगळुरू ते कोईम्बतूर, मंगलोर ते गोवा वंदे भारत यांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे या सहा वंदे भारत एक्सप्रेसला 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतून सर्व वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. म्हणजेच नवीन वर्षात या सहा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करता येणार आहे.