Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचा चेहरा या पाच वर्षात झपाट्याने बदलला आहे. याचे मुख्य कारण वंदे भारत एक्सप्रेस च वाढतं संचालन आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन आपल्या वेगवान प्रवासासाठी विशेष ओळखले जात आहे.
या ट्रेनला असलेली गती इतर एक्सप्रेस ट्रेन च्या तुलनेत तीला वेगळी करत आहेत. तसेच या ट्रेनचा आरामदायी प्रवास प्रवाशांना अधिक आकर्षित करत आहे. हेच कारण आहे की वंदे भारत एक्सप्रेस 2019 मध्ये सुरू झाली आणि शताब्दी, राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत हिला सर्वाधिक पसंती मिळाली.
हे पण वाचा :- पुणे रिंग रोडबाबत महत्वाची बातमी; ‘या’ महिन्यात सुरु होणार प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम, पहा….
आता रेल्वे प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यास उत्सुक आहेत. हेच कारण आहे की आता देशातील सर्व प्रमुख मार्गावर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ही ट्रेन सुरू केली जात आहे. यासाठी शासन देखील प्रयत्न करत आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानला पहिली वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पीएम मोदी यांनी दिल्ली ते अजमेर या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेस बाबत काही महत्त्वाची माहिती देखील सार्वजनिक केली.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात आता लवकरच निओ मेट्रो धावणार; असा राहणार संपूर्ण प्रकल्प, पहा रूटमॅप
मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेसमुळे देशभरातील रेल्वे प्रवाशांचे जवळपास 2500 तास प्रवासातील वाचले आहेत. या वंदे भारत एक्सप्रेस मुळे राजस्थानची राजधानी जयपूरहुन दिल्लीचा प्रवास म्हणजेच देशाच्या राजधानीचा प्रवास सोयीचा होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे जयपुर पिंक सिटी म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे.
साहजिकच आता ही ट्रेन सुरू झाली असल्याने पर्यटक जलद गतीने जयपूरला पोहोचू शकणार आहेत यामुळे तेथील पर्यटनाला चालना मिळेल असा दावा केला जात आहे. फक्त जयपूरचे पर्यटन नाही तर संपूर्ण राजस्थान मधील पर्यटन यामुळे उभारी घेईल असे मत यावेळी तज्ञ व्यक्त करत आहेत पंतप्रधान मोदी यांनी देखील असच मत या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले आहे.
हे पण वाचा :- 14वी वंदे भारत ट्रेन आज सुरु होणार; कोणती महत्वाची शहरे होणार कनेक्ट, मुंबई-गोवा वंदे भारतला मुहूर्त केव्हा? पहा डिटेल्स
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून जवळपास 60 लाख प्रवाशांनी या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास केला असल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिली. एकंदरीत वंदे भारत एक्सप्रेसला संपूर्ण देशभरात पसंती आहे. दरम्यान महाराष्ट्रात आणखीन दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस येत्या काही महिन्यात सुरू होणार आहेत.
यामध्ये मुंबई ते गोवा आणि पुणे ते सिकंदराबाद या वंदे भारत एक्सप्रेस चा समावेश राहणार आहे. सध्या राज्यात एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. आणि आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस येत्या काही महिन्यात महाराष्ट्राला मिळतील असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी फक्त 17 लाखात घर मिळणार, पहा…..