Vande Bharat Express : कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही दिवसात गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. 19 सप्टेंबर अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात रेलचेल वाढली आहे. गणेशोत्सवाच्या सणाला बाजारात विविध ऑफर्स चालवल्या जात आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स गणेशोत्सवानिमित्त सजले आहेत.
तसेच मंगळवारी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. गणेश मंडळ देखील आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथक देखील तयारीतच आहे. एकंदरीत लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी संपूर्ण महाराष्ट्र यावेळी तयार आहे.
येत्या तीन दिवसात लाडक्या गणरायाचे आगमन देखील होणार आहे. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने वंदे भारत ट्रेन मधून गणेशोत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उकडीचे मोदक प्रसाद म्हणून देण्याचा एक कौतुकास्पद असा निर्णय घेतला आहे.
म्हणजेच गणेशोत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थांमध्ये उकडीचे मोदक देखील मिळणार आहेत. महाराष्ट्रातून चालवल्या जाणाऱ्या पाच वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी खाद्यपदार्थांमध्ये उकडीचे मोदक उपलब्ध करून दिले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपुर या पाच वंदे भारत एक्सप्रेस मध्ये गणेशोत्सवाच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये उकडीचे मोदक दिले जाणार असून यासाठी आय आर सी टी सी ला साधारणपणे साडेचार हजार मोदक लागणार आहेत.
आय आर सी टी सी च्या अधिकाऱ्यांनी काही मोदक ऑर्डर करणार तर काही मोदक हे आय आर सी टी सी च्या किचनमध्ये बनवले जाणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना देखील मेनू कार्ड मध्ये मोदक उपलब्ध करून देण्याचे नियोजन आय आर सी टी सी कडून केले जात आहे.