Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता 10 फेब्रुवारी रोजी सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
दरम्यान काल या एक्सप्रेसची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आहे. यामुळे आता सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगर शिर्डी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे मुंबईहून पंढरपूर आणि शिर्डी या दोन महत्त्वाच्या अशा तीर्थस्थळावर जाऊन एकाच दिवसात दर्शन घेऊन मुंबईला परत येणे शक्य होणार आहे.
दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सीएसएमटीवरून साईनगर शिर्डीसाठी सकाळी 6 वाजून 15 वाजता ट्रेन रवाना होणार आहे. मग तिथे ही ट्रेन 12 वाजून 10 ला पोहोचणार आहे. परत तिथून संध्याकाळी 5 वाजून 25 ला सुटणार आहे. मुंबईला 11 वाजून 18 ला पोहोचणार आहे.
सीएसएमटी ते सोलापूर अस राहणार टाईम टेबल
सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत सोलापूरसाठी सी एस एम टी वरुन 6 वाजून 5 मिनीटांनी सुटणार आहे. तर सोलापूरला 12 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. तर सोलापूर येथून संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन सुटणार आहे. ती मुंबईला रात्री 10 वाजून 40 मिनीटांनी पोहोचणार आहे.