Vande Bharat Express News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. नव्या वर्षात अर्थातच 2025 मध्ये भारतीय रेल्वे पुण्याला नवीन आठ वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे. चार वंदे भारत एक्सप्रेस आणि चार नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस म्हणजेच अमृत भारत एक्सप्रेसचा लाभ पुणेकरांना मिळणार आहे.
पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बडोदा या चार मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावणार अशी बातमी मध्यंतरी प्रसारमाध्यमांमधून समोर आली होती. त्यानंतर आता पुण्याला चार अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
अमृत भारत एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नॉन एसी ट्रेन आहे. सर्वसामान्य नागरिकांना वंदे भारत एक्सप्रेस सारख्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अमृतभारत एक्सप्रेस सुरू झाली आहे.
अमृत भारत एक्सप्रेसची विशेषता म्हणजे या गाडीचे तिकीट दर हे वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या गाडीचा फायदा होतोय. आता पुण्यातून उत्तर भारतासाठी चार नव्या अमृतभारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.
कोणत्या मार्गावर धावणार अमृत भारत एक्सप्रेस ?
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पुणे ते दानापूर, पुणे ते छप्रा, हडपसर ते मुझ्झफरपूर आणि हडपसर ते पुरी या चार मार्गांवर अमृत भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी देखील सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे या चारही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत म्हणजेच आठवड्यातून एक दिवस धावतील. नक्कीच या मार्गावर जर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर पुण्यावरून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
पुण्यावरून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. यामुळे पुणे ते उत्तर भारत दरम्यान या गाड्या सुरू झाल्या तर यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस चे तिकीट दर हे माफक आहेत.
सर्वसामान्यांना परवडतील असे तिकीट दर असल्याने या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र असे असले तरी या गाड्या कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.