Vande Bharat Express New Update : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत ट्रेन विषयी मोठ्या चर्चा रंगत आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन आपल्या स्पीडमुळे आणि ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि या ट्रेनच्या विशेषता यामुळे ही ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. दरम्यान आता महाराष्ट्राला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसचीं भेट मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहेत. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या ट्रेनचे उद्घाटन जरी 10 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या करकमलाद्वारे रेल्वेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले असले तरीदेखील प्रत्यक्षात ही ट्रेन 10 फेब्रुवारीलाच सामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार नाही.
म्हणजेच उद्घाटनाच्या दिवशी या ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करता येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र 11 फेब्रुवारीपासून ही ट्रेन सामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे अन तेव्हापासून रोजाना या ट्रेन साठी सामान्य प्रवासी तिकीट बुकिंग करू शकणार आहेत. वास्तविक पाहता राजधानी मुंबईहून गांधीनगर दरम्यान एक वंदे भारत एक्सप्रेस ऑलरेडी महाराष्ट्रातून धावत आहे. मात्र या ट्रेनला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नसल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाला या दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन वंदे ट्रेनपैकी मुंबई-शिर्डी रूटवर धावणारी ही बहुचर्चित वंदे भारत प्रवाशांसाठी मोठी फायदेशीर राहणारा सून ही ट्रेन अल्पावधीत प्रवाशाच्या पसंतीस खरी उतरणार आहे. मुंबई शिर्डी दरम्यानच्या मार्गावरील नाशिक आणि शिर्डी ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
अशा परिस्थितीत ही ट्रेन इतर वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिक कमाई रेल्वेला करून देणारी ठरणार आहे. या सोबत मुंबई ते सोलापूर मार्गावरील मुंबई ते पुणे हा देखील रूट वरदळीचा असून या रूटवर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात आणि पुणे ते सोलापूर या रूटवर देखील लोकांमध्ये ही ट्रेन लोकप्रिय होऊ शकते.
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनचे तिकिटाचे दर खालील प्रमाणे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे तिकीट दर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते पुणे दरम्यान चेअर कारचे (सीसी) भाडे 560 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) चे भाडे 1165 रुपये असू शकते. या भाड्यात केटरिंग शुल्क हे अतिरिक्त राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थेट सोलापूर तिकीट दर
सीएसएमटी ते सोलापूर सीसीचे भाडे 965 रुपये आणि ईसीचे भाडे 1970 रुपये असू शकते. या भाड्यात केटरिंग शुल्क स्वतंत्रपणे जोडले जाईल.
मुंबई-शिर्डी वंदे भारत तिकीट दर
ईतर सामान्य ट्रेनच्या तुलनेत वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर अधिक आहेत. मुंबई ते शिर्डी CC साठी 800 रुपये आणि EC साठी 1630 रुपये मोजावे लागणार आहेत. या ठिकाणी देखील केटरिंग सेवेसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार आहे.
वंदे भारत ट्रेनचं टाइमटेबल
मुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान या वेळी धावणार वंदे भारत ट्रेन
सीएसएमटी ते शिर्डी वंदे भारत ट्रेन ही सकाळी 6.15 am निघणार आहे म्हणजे प्रस्थान करेल आणि साईं नगर शिर्डीला दुपारी 12.10 pm ला ट्रेनचं आगमन या ठिकाणी होणार आहे.
तसेच साईं नगर शिर्डी येथून सायंकाळी 5.25 pm ला प्रस्थान करेल आणि सीएसएमटीला रात्री 11.18 pm ला ही ट्रेन आगमन करणार आहे.
मुंबई ते सोलापूर दरम्यान यावेळी धावणार वंदे भारत
सोलापूरहुन ही ट्रेन सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी निघेल आणि नऊ वाजता पुण्यात पोहोचेल. तसेच दुपारी बारा वाजून 35 मिनिटांनी ही ट्रेन मुंबईला पोहोचणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणाहुन सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी ही ट्रेन निघणार असून पुण्याला सात वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल आणि पुन्हा सोलापूरला रात्री 10:40 ला पोहोचणार आहे.