Vande Bharat Express New Route : देशभरातील रामभक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राम भक्तांना लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून ही Vande Bharat Train देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर सुरू केली जात आहे. या चालू एप्रिल महिन्यात आतापर्यंत पाच गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
देशात आतापर्यंत एकूण सोळा वंदे भारत सुरु झाल्या असून ऑगस्टपर्यंत 75 मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे. आपल्या राज्याला देखील आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. अशातच देशातील तमाम रामभक्तांसाठी केंद्र शासन मोठा निर्णय घेणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, लवकरच रामनगरी अयोध्याला जलद कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून ही संपूर्ण भारतीय बनावटीची गाडी सुरू केली जाणार आहे.
अयोध्या मार्गे लवकरच एक वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. या गाडीमुळे देशभरातील तमाम रामभक्तांना अयोध्येला जाणं सोपं होणार आहे. यामुळे लवकरात लवकर अयोध्या गाठता येणार असून प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे आणि आपली रामप्रभूच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ही गाडी उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट ते प्रयागराज ते अयोध्या ते लखनऊ अशी चालवली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या ट्रेनच्या रूटला राम वन गमन पथ असं नाव देखील दिल जाणार आहे.
या ट्रेनचा फायदा फक्त उत्तर प्रदेश राज्यातील जनतेला होईल असं नाही तर जे देशभरातील रामभक्त उत्तर प्रदेश मधील अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी येतील त्या सर्व लोकांना या ट्रेनचा फायदा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही गाडी यावर्षीच सुरू करण्याचे नियोजन केंद्र सरकारने आखले आहे. वास्तविक, भव्य राम मंदिराचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे भव्य राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येत लाखोंच्या संख्येने रामभक्त दरवर्षी दाखल होणार आहेत.
आत्ताही लाखोच्या संख्येने रामभक्त अयोध्येत येतात मात्र जेव्हा भव्य राम मंदिराचे निर्माण होईल त्यावेळी या संख्येत अजून भर पडण्याची शक्यता आहे. म्हणून केंद्र शासनाकडून तसेच उत्तर प्रदेश राज्य शासनाकडून राममनगरी अयोध्येला जलद कनेक्टिव्हिटी देण्यासाठी प्रयत्न सुरू असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी सरकार या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवणार आहे.
निश्चितच कोणत्या मार्गावर ही गाडी सुरू होणार याबाबत तर माहिती हाती आली आहे. परंतु ही गाडी केव्हा सुरू होईल? यासाठी किती तिकीट दर असतील? याबाबत अद्याप कोणतीच माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेली नाही परंतु लवकरच ही देखील माहिती समोर येईल आणि ही देखील गाडी लवकरात लवकर राम भक्तांच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे.