Vande Bharat Express : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नागपूर शहराला तिसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. सध्या नागपूर येथून दोन चेअर कार वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
खरे तर या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत आठ वंदे भारत एक्सप्रेस या सेमी हाय स्पीड ट्रेनची भेट मिळालेली आहे. महत्त्वाची बाब अशी की, येत्या 15 सप्टेंबरला देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. यामध्ये नागपुरहुन सुरू होणाऱ्या ट्रेनचा देखील समावेश राहणार आहे.
नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर ही गाडी चालवली जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून रवाना झालेली १६ डब्यांची वंदे भारत सोमवारी रात्री उशिरा अजनी यार्डमध्ये दाखल झाली आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाकडून खूपच गोपनीयता राखली जात आहे. दरम्यान आता आपण या वंदे भारतचे संपूर्ण वेळापत्रक कसे राहील याबाबत माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक
मंगळवार वगळता नागपूर रेल्वे स्थानकावरून ही ट्रेन पहाटे ५ वाजता रवाना होईल आणि दुपारी सव्वा बारा वाजता सिकंदराबादला पोहोचचणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून मंगळवार वगळता दुपारी १ वाजता सोडली जाईल अन नागपूरला रात्री ८.२० वाजता येईल.
कुठं असणार थांबा?
या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळालेला आहे. सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ या स्थानकावर ही गाडी थांबणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.