Vande Bharat Express : महाराष्ट्रात सध्या वंदे भारत ट्रेन बाबत मोठ्या चर्चा रंगत आहेत. 10 फेब्रुवारीला राज्यात एकूण दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा दोन वंदे भारत ट्रेन ला हिरवा झेंडा मिळणार असून 11 फेब्रुवारी रोजी या दोन्ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत नियमितपणे दाखल होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पीएम मोदी या दोन्ही ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान आता या ट्रेन बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता या ट्रेनमध्ये प्रवाशांना कोणकोणते पदार्थ जेवणासाठी उपलब्ध होतील याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
आय आर सी टी सी कडून या दोन्ही वंदे भारत ट्रेनमध्ये मराठमोळ्या पदार्थांचीं उपलब्धता करून दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, राजगिरा आणि नाचणी पासून बनवलेल्या भाकरीचा समावेश राहणार आहे. इतरही जे काही नाश्ता आणि जेवण मध्ये पदार्थ असतील ते प्रामुख्याने महाराष्ट्रीयन पदार्थ राहणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया यात दोन वंदे भारत ट्रेनमध्ये नाष्टा आणि जेवणासाठी कोणकोणते पदार्थ प्रवाशांना उपलब्ध असतील.
असा असेल वंदे भारत मधला नाश्ताचा बेत
दोन्ही गाड्यांमध्ये सकाळच्या न्याहारीसाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन, पोहा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय राहणार आहेत.
असं राहणार दुपारचं जेवण
मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेनमध्ये, जेवणासाठी शाकाहारींसाठी व्हेज शेंगदाणा पुलाव, किंवा वाटाणा पुलाव , भाकरी- आमटी, दाण्याची उसळ, झुणका राहणार आहे.
याशिवाय जे मासांहारी असतील अशा प्रवाशांसाठी चिकन सावजी, चिकन तांबडा रस्सा, चिकन कोल्हापुरी अशी ठसकेदार मेजवाणी असेल.
सायंकाळी असा राहणार नाश्ता
सायंकाळच्या नाश्त्याचा जर विचार केला तर साबुदाणा वडा, शेगावची कचोरी, कोथींबीर वडी, थालीपीठ, मल्टी ग्रेन भडंग, साबुदाणा वडा, बाकरवडी असा मेन्यू राहणार आहे. म्हणजे पूर्णपणे मराठमोळ्या नाश्त्याची सोय या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी एक मोठी गोष्ट अशी की प्रवाशांना बाजरी ज्वारी आणि नाचणी अशा तिन्ही प्रकारच्या भाकरी मिळणार आहेत.
या ठिकाणी एक गोष्ट विशेष ती म्हणजे वंदे भारत ट्रेन ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जे तिकीट काढावे लागेल त्यामध्ये जेवणाचा समावेश राहणार नाही. जेवणासाठी अतिरिक्त चार्जेस प्रवाशांना द्यावे लागणार आहेत. दरम्यान वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी किती तिकीट प्रवाशांना लागू शकते याबाबत माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर आपण भेट देऊ शकता.
वंदे भारत एक्सप्रेस : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकिटाचे दर झालेत जाहीर