Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी या चालू महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 10 फेब्रुवारी रोजी त्यांचा हा दौरा आयोजित असून या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे सध्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठ्या प्रमाणात चर्चा गाजत आहे. दरम्यान या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी तिकिटाचा दर काय असेल याबाबत देखील अनेकांमध्ये उत्सुकता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती तिकीट लागेल याविषयी जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 10 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सीएसएमटी-शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्याची नियोजन मध्य रेल्वेने आखले आहे.
सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस वेळापत्रक
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी 6.15 ला निघणार आणि शिर्डीत दुपारी 12.10 ला पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ट्रेनचा परतीचा प्रवास सायंकाळी 5.25ला सुरू होणार अन मुंबईत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी रात्री 11.18ला ही ट्रेन पोहोचणार आहे.
हा प्रवास पाच तास 55 मिनिटांत पूर्ण होणार असल्याची माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारला धावणार नाही. इतर दिवस नियमितपणे ही ट्रेन सुरू राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे शिर्डी, नाशिक, ठाणे, दादर, मुंबई हे थांबे राहणार आहेत.
सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस वेळापत्रक
सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी ही रेल्वे सुटेल 9 वाजता पुणे येथे पोहचेल आणि दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला म्हणजे मुंबईला पोहोचणार आहे. दरम्यान या रेल्वेच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर त्याच दिवशी सायंकाळी ही रेल्वे मुंबईहून सोलापूरच्या दिशेने निघेल.
सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी मुंबईहून निघाल्यानंतर सात वाजून 30 मिनिटांनी ही रेल्वे पुण्यात दाखल होईल अन मग रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही रेल्वे सोलापूरला पोहोचेल. दरम्यान मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही रेल्वे धावणार नाही. ही रेल्वे दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मित्रांनो या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीटचे दर जाहीर झाले असून याची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वंदे भारत एक्सप्रेस : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकिटाचे दर झालेत जाहीर