Vande Bharat Express : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या खूपच चर्चा पाहायला मिळत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2019 मध्ये भारतीय रेल्वेने सर्वप्रथम वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. तेव्हापासून ही गाडी देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे.
आतापर्यंत देशभरातील तब्बल 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष बाब अशी की, आगामी काही महिन्यात देशभरातील आणखी 40 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे. अशातच मात्र वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.
एसी चेअर वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता आता स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. स्लीपर कोची वंदे भारत सुरू झाली तर रात्रीच्या वेळी देखील प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. खरंतर सध्या देशात सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस दिवसा धावत आहेत.
मात्र जेव्हा ही स्लीपर कोचवाली गाडी सुरू होईल तेव्हा रात्री देखील वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता येणे शक्य होईल. स्लीपर कोच वाली ही गाडी लांबच्या रूटवर सुरु केली जाणार आहे. ही गाडी राजधानी एक्सप्रेस ऐवजी सुरू होऊ शकते अशी माहिती रेल्वेच्या विश्वस्त सूत्रांनी दिली आहे. दरम्यान भारतीय रेल्वेच्या माध्यमातून स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू होणार याबाबत देखील एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे.
केव्हा सुरू होणार स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेस
रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (ICF) प्रोटोटाइप स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे सदर अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे पुढील 24 महिन्यात या ट्रेनचे काम पूर्ण होणार आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट बनवण्याचा महत्त्वाचा उपक्रम सध्या सुरू आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड रशियन कंपनी TMH सोबत लातूर येथील रेल्वेच्या कोच फॅक्टरीमध्ये 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहे.
याशिवाय टिटागड वॅगन्स आणि BHEL संयुक्तपणे उर्वरित 80 गाड्यांचे उत्पादन करत आहेत. अशा तऱ्हेने एकूण 200 स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन बनवल्या जाणार आहेत. एकंदरीत पुढील दोन वर्षात देशात स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. निश्चितच रेल्वेचा हा निर्णय भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक सिद्ध होणार आहे.