Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनच्या गेल्या काही वर्षांपासून मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, याच वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. सध्या स्थितीला संपूर्ण देशभरात 41 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.
विशेष म्हणजे या गाडीचे जाळे अधिका-अधिक विस्तारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. जिथे अजूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही, तिथे ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास हा खूपच आरामदायी आणि जलद झाला आहे. आपल्या राज्यालाही आतापर्यंत 7 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली असून आणखी दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
सेंट्रल रेल्वेवर या नवीन दोन गाड्या चालवल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या स्थितीला राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपूर तथा इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अर्थातच मुंबईला आत्तापर्यंत पाच वंदे भारती एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. यातील चार गाड्या मध्य रेल्वे मार्गावर धावत आहेत आणि उर्वरित एक गाडी ही पश्चिम रेल्वे मार्गावर धावत आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील गाडी अर्थातच मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या गाडीमुळे गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कसा राहणार नवीन एक्सप्रेसचा रूट ?
मुंबई ते कोल्हापूर चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान धावणार आहे.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावणारी ही पाचवी गाडी ठरणार आहे. या गाडीमुळे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
याशिवाय पुणे ते वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस वसई रोड मार्गे चालवली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.