Vande Bharat Express : हवे सारखा स्पीड आणि राजा महाराजा सारखा थाटात प्रवास अशी वंदे भारत एक्सप्रेसची ओळख. ही गाडी मात्र चार वर्षांच्या काळात नागरिकांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. आता या गाडीचा हेवा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वाटू लागला आहे.
या गाडीचा प्रवास सर्वांनाच आवडत असून ही गाडी देशभरातील वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून मागणी केली जात आहे. हेच कारण आहे की केंद्र शासनाच्या आदेशानुसार भारतीय रेल्वे देशातील विविध मार्गावर ही गाडी सुरू करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे.
आतापर्यंत 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. या मार्गांमध्ये महाराष्ट्रातील पाच रेल्वे मार्गांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. महाराष्ट्राला देखील दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कमाल 180 किलोमीटर प्रति तास एवढा वेग असलेल्या या हाय स्पीड ट्रेनला देशातील कोणत्या महत्त्वाच्या 10 मार्गावर सुरू केले जाणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या 10 मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
सर्व दहा मार्गांची माहिती समोर आलेली नाही. पण काचेगुडा-यशवंतपूर (बेंगळुरू), सिकंदराबाद-पुणे, सिकंदराबाद-नागपूर, आणि विजयवाडा-चेन्नई मार्गे तिरुपती या चार मार्गांची माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चार मार्गावर लवकरच ही गाडी सुरू होणार आहे.
सिकंदराबाद-पुणे आणि सिकंदराबाद-नागपूर केव्हा धावणार
सध्या, सिकंदराबाद ते पुणे या मार्गावर शताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु आहे. पण या गाडी ऐवजी आता या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना असल्याची माहिती प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. खरतर सध्या, शताब्दीला सिकंदराबाद ते पुणे हा प्रवास करण्यासाठी जवळपास साडेआठ तासांचा कालावधी लागतो.
पण, या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्यास यात एक ते दीड तासांची बचत होऊ शकते असे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे नागपूर ते सिकंदराबाद दरम्यानच्या प्रवासासाठी सध्या उपलब्ध असलेल्या एक्सप्रेसने प्रवास केला तर सात तासांचा वेळ लागतो.
पण या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर हा प्रवासाचा कालावधी केवळ पाच तासांवर येणार आहे. तसेच सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला काझीपेठ, रामागुंडम, मंचेरियल, सिरपूर कागजनगर आणि बल्हारशाह या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.