Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील ही पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन सध्या स्थितीला 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरु आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास हा खूपच सुपरफास्ट झाला आहे. जलद आणि आरामदायी प्रवासामुळे ही गाडी प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन आपल्या महाराष्ट्रातील आठ महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान जर तुम्ही शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
जर तुम्हीही सीएसएमटीवरून शिर्डीला जाऊ इच्छित असाल तर या प्रवासासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील ? याचे वेळापत्रक कसे राहणार ? याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
सीएसएमटी शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
CSMT ते शिर्डी दरम्यान गाडी क्र. 22223 चालवली जात आहे. ही ट्रेन सीएसएमटीहून सकाळी 6.20 वाजता सुटते आणि त्याच दिवशी सकाळी 11.40 वाजता शिर्डीला पोहोचते.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ट्रेन क्र. 22224 शिर्डीहून संध्याकाळी 5.25 वाजता सुटते आणि 10.50 वाजता सीएसएमटीला पोहोचते.
वंदे भारत ट्रेन कोण-कोणत्या स्थानकावर थांबते
सीएसएमटी-शिर्डी साईनगर वंदे भारत ट्रेन सहा वाजून वीस मिनिटांनी सीएसएमटी येथून रवाना होते, दादर स्टेशनवर सकाळी 6.30 वाजता येते, ठाणे स्टेशनला 6.49 वाजता येते, कल्याणला ७.११ वाजता, नाशिकला सकाळी ८.५७ ला येते आणि सकाळी 11.30 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचते. म्हणजेच ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबते.
तिकीट दर किती ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना चेअर कारने प्रवास करायचा असल्यास त्यांना मुंबईहुन 975 रुपये, दादरहुन 975 रुपये, ठाण्याहुन 915 रुपये, कल्याणहुन 875 रुपये आणि नाशिकरोडहुन 655 रुपयाचे तिकीट काढावे लागणार आहे.
तसेच या मार्गावर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 1195 रुपयांपासून 1840 रुपयांपर्यंत एवढे पैसे मोजावे लागतात.