Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सध्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. या गाडीचा वेग आणि या गाडीमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा प्रवाशांच्या पसंतीस खऱ्या उतरल्या असून या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
हेच कारण आहे की भारतीय रेल्वे देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या स्थितीला आपल्या महाराष्ट्रातील आठ महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस आपल्या महाराष्ट्राला मिळतील अशी शक्यता आहे.
दरम्यान आज आपण वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. वंदे भारत एक्सप्रेस मध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच प्रवासासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक खास राहणार आहे.
कारण की आज आपण वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना मांसाहार जेवण खायला मिळते का, तसेच वंदे भारत एक्सप्रेस मध्ये जेवण बुक कसे करावे लागते आणि जर घरून जेवणाचा डब्बा नेला तर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये घरचे जेवण खाता येते का यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता आपण पाहणार आहोत.
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मांसाहारी जेवण मिळते का ?
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मांसाहारी जेवण मिळत नाही. प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करताना फक्त शाकाहारी जेवण ऑर्डर करता येते. तसेच जर प्रवाशांनी घरून डब्बा आणलेला असेल तर त्यांना घरचे जेवण ट्रेनमध्ये खाता येणार आहे.
जर एखाद्या प्रवाशाने घरचा डब्बा आणलेला असेल तर त्याला वंदे भारत एक्सप्रेस मध्ये निवांत जेवण करता येणार आहे, त्याला कोणीच रोखू शकत नाही.
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये जेवण कसे बुक करणार
वंदे भारत एक्सप्रेस ही इतर सामान्य एक्सप्रेस ट्रेन सारखी नाहीये. या गाडीमध्ये फेरीवाले फिरत नाहीत. यामुळे जर तुम्ही जेवण बुक केले नाही तर तुम्हाला उपाशीच रहावे लागू शकते.
शिवाय ही गाडी खूपच मोजक्या रेल्वे स्थानकावर थांबते. तसेच या गाडीचे दरवाजे स्वयंचलित असल्याने जर तुम्ही मध्येच रेल्वे स्थानकावर उतरला तर तुम्हाला धावून रेल्वे पकडता येणे अशक्य आहे.
यामुळे वंदे भारत एक्सप्रेसने जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला आधीच जेवणाची ऑर्डर द्यावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करता तेव्हाच तुम्हाला जेवण बुकिंगचा ऑप्शन मिळतो.
तिकीट बुक करताना तुम्ही चहा, नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा पर्याय मिळतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार चहा, नाष्टा किंवा जेवण ऑर्डर करू शकता. यानुसार मग तुम्हाला तिकीटाचे पैसे भरावे लागतात.