Vande Bharat Express : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी समोर आली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांना एक मोठी भेट देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईला नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती. तेव्हापासून आजतागायत जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. या 34 पैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात हे विशेष.
राज्यातील मुंबईत येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
म्हणजेच सहा पैकी जवळपास चार गाड्या राजधानी मुंबईवरूनच धावत आहेत. विशेष म्हणजे या वर्षा अखेरपर्यंत मुंबईला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
म्हणजेच या दोन प्रस्तावित गाड्या सुरू झाल्यानंतर राजधानी मुंबईमधून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 6 वर जाणार आहे. निश्चितच राजधानीमधील नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी राहणार आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. याशिवाय मुंबई ते जालना या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवणे प्रस्तावित आहे.
यापैकी मुंबई ते कोल्हापूर ही वंदे भारत एक्सप्रेस 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केली जाईल अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
निश्चितच या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे. यामुळे राजधानीमधील भाविकांना कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला जाने सोयीचे होणार आहे.
याशिवाय मुंबई ते जालना ही गाडी देखील या वर्षी अखेरपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत केव्हाही सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे.
मात्र याबाबत भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे आता या दोन गाड्या या वर्षअखेरपर्यंत धावतात का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.