Vande Bharat Express : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी आपल्या स्पीडसाठी विशेष ओळखली जाते. या गाडीचा कमाल वेग तब्बल 160 किलोमीटर प्रतितास असल्याचा दावा केला जातो. मात्र सध्या स्थितीला या गाडीला 130 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्यास परवानगी देण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान झाल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात ही गाडी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते का हा अनेकांचा प्रश्न आहे. खरंतर ही गाडी देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर सुरू आहे. या 25 पैकी पाच मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, नागपूर ते बिलासपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या पाच महत्त्वाचा मार्गावर ही गाडी सुरू आहे. यापैकी मुंबई ते साईनगर शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर फेब्रुवारी 2023 मध्ये ही गाडी सुरू झाली आहे.
ज्यावेळी ही गाडी सुरू झाली तेव्हा या मार्गावर ही गाडी सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान होईल त्यांना कमी कालावधीत प्रवास करता येणे शक्य होईल असा दावा केला जात होता. मात्र या वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात नुकतीच एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची तसेच थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगाबाबत. देशातील सर्वात वेगाने धावणाऱ्या टॉप 14 वंदे भारत एक्सप्रेसची लिस्ट समोर आली आहे. विशेष म्हणजे कोणती वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या स्पीडने धावते याबाबत देखील माहिती हाती आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचा ऍक्च्युअल स्पीड किती?
2019 मध्ये सुरू झालेली देशातील पहिली अर्थातच नवी दिल्ली ते वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस ताशी 96.37 किलोमीटर वेगाने धावते. ही देशातील सर्वात वेगवान वंदे भारत एक्सप्रेस आहे.
दुसऱ्या क्रमांकावर हजरत निजामुद्दीन ते राणी कमलापती वंदे भारत एक्सप्रेस चा नंबर लागतो आणि या गाडीचा ताशी वेग 95.89 किलोमीटर आहे.
चेन्नई ते कोयंबतूर दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या गाडीचा ताशी वेग 90.36 किलोमीटर आहे.
नवी दिल्ली ते आंदोरा दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस चौथ्या क्रमांकावर येते या गाडीचा वेग 84.85 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.
सिकंदराबाद ते विशाखापटनम दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पाचव्या क्रमांकावर येते आणि या गाडीचा ताशी वेग 84.21 किलोमीटर एवढा आहे.
याशिवाय गांधीनगर ते मुंबई दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सहाव्या क्रमांकावर येते आणि या गाडीचा ताशी वेग हा 83.87 किलोमीटर एवढा आहे.
अजमेर ते दिल्ली कॅन्ट दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सातव्या क्रमांकावर येते आणि या गाडीचा ताशी वेग हा 83.10 km आहे.
नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी दरम्यान चालवली जाणारी गाडी आठव्या क्रमांकावर येते आणि हिचा ताशी वेग फक्त 81.87 किलोमीटर एवढा आहे.
सिकंदराबाद तिरुपती ही गाडी नवव्या क्रमांकावर येते या गाडीचा ताशी वेग हा 79.63 किलोमीटर एवढा आहे.
चेन्नई ते मैसूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या गाडीचा दहावा क्रमांक लागतो. या गाडीचा वेग 79.36 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.
नागपूर बिलासपूर ही गाडी अकराव्या क्रमांकावर येते या गाडीचा ताशी वेग 77.92 किलोमीटर आहे.
हावडा ते न्यू जलपैगुडी या गाडीचा बारावा क्रमांक लागतो आणि हिचा ताशी वेग ७६.८४ किलोमीटर आहे.
मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तेरावा क्रमांक लागतो आणि या गाडीचा ताशी वेग हा फक्त ७१.६५ किलोमीटर आहे.
तसेच मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा 14 वा क्रमांक लागतो आणि या गाडीचा ताशी वेग हा फक्त 65.96 किलोमीटर आहे.