Vande Bharat : आगामी वर्षात लोकसभा आणि काही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे देशात सध्या वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जात आहेत. या गाडीची वाढती लोकप्रियता पाहता मोदी सरकार देशातील प्रमुख मार्गांवर ही गाडी सुरू करतं आहे. आतापर्यंत देशात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राला देखील एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस चा लाभ सध्या मिळत आहे.
आगामी काही महिन्यात महाराष्ट्रात आणखी काही महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे. एक एप्रिलला देशात अकरावी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान 11 वी वंदे भारत गाडी सुरू झाली असून आज अर्थातच 8 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर मध्ये घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! म्हाडा बांधणार ‘इतके’ घरे
आज सुरू होणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेस आणि यापूर्वी सुरू झालेल्या 11 वंदे भारत एक्सप्रेस अशा एकूण 13 वंदे भारत एक्सप्रेस देशात आजपासून कार्यान्वित होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सिकंदराबाद ते तिरुपती आणि चेन्नई ते कोइंबतूर या मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करणार आहेतं. निश्चितच या वंदे भारत गाड्यांमुळे दक्षिणेकडील राज्यांना मोठा फायदा होणार आहे.
दक्षिणेकडील राज्यात आगामी काही महिन्यात निवडणुका सुरू होणार असल्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून या वंदे भारत गाड्या सुरू केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता आपण या नविन वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर ! Mumbai-Pune Missing Link प्रकल्प ‘या’ दिवशी होणार सुरु; वाचा सविस्तर
सिकंदराबाद ते तिरुपती या रूट वर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे मात्र मंगळवारी ही ट्रेन धावणार नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान धावणारी ही ट्रेन सिकंदराबादहून सकाळी 6 वाजता निघेल आणि तिरुपतीला 1.30 वाजता पोहोचेल.
तर दुसरीकडे, तिरुपतीहून 15.15 वाजता सुरू होईल आणि 23.45 ला सिकंदराबादला पोहचणार आहे. निश्चितच, आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हैदराबाद आणि देशातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र अर्थातच तिरुपती या वंदे भारत ट्रेनमुळे परस्परांना कनेक्ट होणार आहे.
यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणार असून तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी सोय होणार आहे. चेन्नई ते कोईम्बतूर या मार्गावर सुरू होणारे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील सहा दिवस सुरू राहील मात्र बुधवारी ही ट्रेन धावणार नाही.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही वंदे भारत ट्रेन सकाळी 6 वाजता कोईम्बतूर इथून निघेल आणि 12: 10 पर्यंत चेन्नई सेंट्रलला पोचेल. त्यानंतर 2:20 ला परत चेन्नईवरून निघेल आणि रात्री 8:30 पर्यंत कोईम्बतूरला पोहचणार आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग : ‘या’ दोन शहरादरम्यान धावणार 12वी वंदे भारत ट्रेन ! पहा संपूर्ण डिटेल्स….