Upcoming Vande Bharat Express List : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत वेग-वेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. शासनाकडूनही देशातील प्रमुख रेल्वे मार्गावर ही ट्रेन चालवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत केंद्र शासनाने देशातील चार महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू केली आहे. विशेष बाब अशी की एप्रिल महिन्यात आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
20 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ येथील त्रिवेंद्रम ते कासारगोड यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून हाती आली आहे. ही देशातील पंधरावी वंदे भारत एक्सप्रेस राहणार असून केरळची ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस राहील. अशातच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशभरात एकूण 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ रूटवर धावणार देशातील 16वी Vande Bharat Train; मे महिन्यात होणार उदघाट्न, पहा…..
मात्र कोणत्या 75 रूटवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रवाशांमध्ये आहे. खरं पाहत, ही गाडी 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र भारतीय रेल्वे बोर्डाने या गाडीला 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास परवानगी दिली आहे. पण ही गाडी अद्याप 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने कोणत्याच रूटवर धावत नाही.
परंतु शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसची तुलना केली असता वंदे भारत एक्सप्रेस या दोन्ही एक्सप्रेस पेक्षा अधिक गतीने प्रवास करत असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे. एकंदरीत या वंदे भारत ट्रेनने गतिमान प्रवास करता येणे प्रवाशांना शक्य बनले आहे. शिवाय ही ट्रेन जागतिक दर्जाच्या सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देते यामुळे प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी बनत आहे.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय; आता ‘या’ शेतकऱ्यांना पण कांदा अनुदान मिळणार, शेतकऱ्यांची मोठी चिंता दूर
हेच कारण आहे की, या ट्रेनचे भाडे हे इतर ट्रेनच्या तुलनेत अधिक आहे तरी देखील प्रवाशांनी या गाडीला अधिक पसंती दर्शवली असून आता देशभरातील वेगवेगळ्या मार्गावर ही ट्रेन सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या माध्यमातून मागणी केली जात असून स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आपल्या भागात ही ट्रेन सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवत आहेत.
विशेष म्हणजे आगामी वर्षात काही राज्यात विधानसभा निवडणुका राहणार आहेत तसेच लोकसभा निवडणुका देखील असतील यामुळे केंद्र शासनाकडून देशातील एकूण 75 मार्गावर ही ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आज आपण नेमक्या कोणत्या मार्गावर ही ट्रेन सुरू होऊ शकते याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा वेग किती? समोर आली धक्कादायक माहिती, पहा….
या मार्गांवर सुरु होणार ही गाडी
जरी मीडिया रिपोर्ट्स मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 75 रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू केली जाईल असं सांगितलं जात असलं तरी देखील अद्याप संपूर्ण 75 रेल्वे मार्गाची माहिती हाती आलेली नाही. परंतु काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये आगामी काही महिन्यात देशभरातील एकूण 30 रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण ते 30 मार्ग कोणते याबाबत जाणून घेऊया. तसेच राज्यातील कोणत्या शहराला या वंदे भारत ट्रेनचा आगामी काही महिन्यात लाभ मिळेल याबाबत जाणून घेऊया.
हे पण वाचा :- मुंबईची चांदी होणार ! आणखी 3 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार; रूटची माहिती वाचा इथं
- मुंबई ते मडगाव
- जबलपूर ते इंदूर
- हावडा ते पुरी
- सिकंदराबाद ते पुणे
- तिरुवनंतपुरम ते मंगलुरु
- चेन्नई एग्मोर ते कन्याकुमारी
- मंगलुरु ते म्हैसूर
- इंदौर ते जयपूर
- विजयवाडा ते चेन्नई सेंट्रल
- जयपूर ते आग्रा
- नवी दिल्ली ते कोटा
- नवी दिल्ली ते बीकानेर
- मुंबई ते उदयपूर
- हावडा जंक्शन ते बोकारो स्टील सिटी
- हावडा जंक्शन ते जमशेदपूर
- हावडा जंक्शन ते पटना
- हावडा जंक्शन ते वाराणसी
- विशाखापट्टनम ते शालीमार
- भुवनेश्वर ते विशाखापट्टनम
- तिरुपती ते विशाखापट्टनम
- नरसापूरम ते विशाखापट्टनम
- नरसापूरम ते गुंटूर
- बेंगलुरु ते धारवाड
- बेंगलुरु ते विजयवाडा
- बेंगलुरु ते कुरनूल
- बेंगलुरु ते कोयंबटूर
- एर्नाकुलम जंक्शन ते चेन्नई सेंट्रल
- चेन्नई एग्मोर ते मदुरई जंक्शन
- चेन्नई सेंट्रल ते सिकंदराबाद
- बेंगलुरु ते कन्याकुमारी
अर्थातच मुंबई ते मडगाव, मुंबई ते उदयपूर आणि पुणे ते सिकंदराबाद या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरू होणार असून यामुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन कॅपिटल शहरांना लाभ होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ शहरापर्यंत धावणार ! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मान्यता मिळाली