Unhali Kanda Market 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील कांदा मार्केट थोडेसे बदलले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या कालावधीत कांद्याला बाजारात फारसा दर मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली होती. बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने पिकासाठी आलेला खर्च देखील अनेकांना भरून काढता आला नाही.
पिकासाठी आलेला उत्पादन खर्च तर सोडा अनेकांना वाहतुकीचा खर्च देखील वसूल करता आला नाही. यामुळे शेतकरी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात नाराज होत. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याला बाजारात मोठी मागणी आली. यामुळे कांदा बाजारभावात मोठी सुधारणा ही पाहायला मिळत आहे.
आज देखील राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळाला. आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सर्वाधिक 3500 चा दर मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्केटमध्ये आज लाल कांद्याची दहा हजार अकरा क्विंटल आवक झालेली होती.
यामध्ये कांद्याला किमान 500, कमाल 3500 आणि सरासरी 2400 असा दर मिळाला आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उन्हाळी कांद्याला काय दर मिळाला
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 3150 आणि सरासरी 2300 असा दर मिळाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 2921 आणि सरासरी 2700 असा दर मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 700, कमाल 3100 आणि सरासरी 2600 असा दर मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार बारा, कमाल 3200 आणि सरासरी 2960 असा दर मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3,070 आणि सरासरी 2900 असा दर मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 3200 आणि सरासरी 2950 असा दर मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 200, कमाल 3100 आणि सरासरी 2200 एवढा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : कोपरगावच्या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2960 आणि सरासरी 2675 असा दर मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3402 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.