Unhali Kanda Bajarbhav : नाफेडने बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशेष म्हणजे हा कांदा अवघा 35 रुपये प्रति किलो या दरात विकला जाणार आहे. मुंबई, दिल्लीच्या बाजारांमध्ये हा कांदा आता पोहोचला असून ग्राहकांना उपलब्ध होऊ लागला आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढेल आणि यामुळे बाजार भाव घसरतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
खरे तर लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा अगदीच कवडीमोल दरात विकला जात होता. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता. अनेकांनी पदरमोड करून कांदा पिकासाठी आलेला खर्च भागवला. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर बाजाराचे चित्र पूर्णपणे पालटले.
निवडणुकीनंतर बाजारभावात मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली. बाजारात कांद्याची मागणी वाढल्यानंतर बाजार भाव सुधारलेत. महत्त्वाचे म्हणजे बाजार भाव सुधारल्यानंतर आता बरेच दिवस झालेत तरीही बाजारभावात फारशी घसरण झालेली नाहीये. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळतंय.
पण, अशातच आता नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवला गेला आहे. यामुळे नाफेडचा कांदा बाजारात आल्यानंतर बाजारभावात खरंच घसरण होत आहे का याचबाबत आज आपण आढावा घेणार आहोत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
राज्यातील उन्हाळी कांद्याचे बाजार भाव
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. येथे कांद्याला किमान 4000, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा दर मिळाला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4300 आणि सरासरी 4000 असा दर मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4500 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 2500, कमाल 4256 अन सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांदा किमान दोन हजार, कमाल 4799 आणि सरासरी 3900 असा दर मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 4300 आणि सरासरी 3850 असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4500 आणि सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 2100, कमाल 4500 अन सरासरी ४०११ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4325 आणि सरासरी 3800 असा दर मिळाला आहे.