Tur Rate : तूर उत्पादकांसाठी एक कामाची बातमी आहे. तुर हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. पण या पिकाची शेती ही प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण तूर या पिकावर अवलंबून आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वी तुरीचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते.
यामुळे तूर उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला होता. सध्या मात्र राज्यातील प्रमुख बाजारात तुरीला आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी दहा हजार रुपयांचा भाव मिळत होता आता मात्र बाजार भाव 10000 पेक्षा खाली आले आहेत. यामुळे तुर उत्पादकांची दहा हजाराचा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा आहे.
यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे, मात्र असे असतानाही तुरीचे बाजारभाव दहा हजाराचा टप्पा घाटत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
तुरीचे बाजार भाव दहा हजार रुपयांपेक्षा अधिक राहिले असते मात्र शासनाचे धोरण शेतकरी विरोधी असून यामुळेच तुरीचे बाजारभाव सध्या दहा हजारापेक्षा कमी आहेत असे मत काही शेतकरी व्यक्त करत आहेत.
मात्र सध्याचे तुरीचे बाजार भाव हे हमीभावापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे हा बाजारभाव समाधानकारक असल्याचे मत काही शेतकरी व्यक्त करत आहेत. तथापि शेतकऱ्यांनी यामध्ये वाढ झालीच पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आगामी काळात नव्या तुरीची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, यामुळे सध्या जो भाव मिळत आहे तो भाव आगामी काळात कायम राहील का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे शासनाच्या माध्यमातून यंदा तुरीची बाजारभावात खरेदी केली जाणार आहे.
शिवाय उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामुळे तुरीच्या बाजारभावातील ही तेजी आगामी काळातही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.