Tur Rate : दहा दिवसांपूर्वी तुरीला विक्रमी भाव मिळत होता. मात्र या दहा दिवसांच्या काळातच तुरीचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आले असेल. एकीकडे धान्य पिकाला भाव मिळतं नाहीये यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. सोयाबीन समवेतच कापसालाही बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीये.
यामुळे सोयाबीन कापूस नाही तर निदान तूर पिकातून तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. दहा दिवसांपूर्वीची परिस्थिती पाहता तूर लागवडीतून तरी पैसा हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण तुरीचा दर गेल्या दहा दिवसांत दीड ते दोन हजार रुपयांनी घसरला आहे.
यामुळे आता तुरीचे पीकही शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरणार असे दिसते. गेल्या दहा दिवसांपूर्वी १० हजार रुपये प्रतिक्विंटल असलेले तुरीचे भाव आता ८१०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. दुय्यम पीक असलेल्या तुरीला भाव मिळेल. अशी अपेक्षा असताना तुरीचे भाव घसरत आहेत.
यंदा उत्पादन बऱ्यापैकी आहे, मात्र आयात केलेल्या तुरीमुळे भाव घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळत आहे. आधीच कापूस, सोयाबीन यांसारख्या मुख्य पिकाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये आणि आता दुय्यम पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुरीलाही बाजारात पाहिजे तसा दर मिळत नाहीये.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील शासनाने तुरीसाठी ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. म्हणजे सध्याचा दर हा हमीभावापेक्षा नक्कीच अधिक आहे मात्र पिकासाठी वाढत चाललेला उत्पादन खर्च पाहता तुरीला हमीभावापेक्षा अधिक दर मिळणे अपेक्षित आहे.
तुरीला किमान दहा हजाराचा भाव मिळावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची इच्छा आहे. पण, आता तुरीचे दर आठ हजार शंभर रुपयांपर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून तूर काढायला सुरुवात केली आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी तुरीची आवक जेव्हा नियंत्रणात होती तेव्हा तुरीला १० हजार ते ९७५० रुपये भाव मिळत होता. आता मात्र तुरीची आवक थोडीशी वाढली आहे आणि यामुळे हा दर १५०० ते २ हजार रुपयांनी खाली आला असून ७९०० ते ८१०० रुपये प्रतिक्विंटल या दराने तुरीची विक्री होत आहे.