Tur Rate : तूर उत्पादकांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपूर्वी तुरीचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या पार होते. पण गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या बाजारभावावर संक्रांत पाहायला मिळतं आहे.
तुरीचे बाजार भाव कमालीचे दबावत पाहायला मिळत आहेत. याचा परिणाम म्हणून उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असेच बाजार भाव दबावात राहिले तर पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
खरेतर यंदा पावसाच्या लहरीपणामुळे तुर पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाहीये. उत्पादनात खूप मोठी घट आली आहे.
त्यामुळे सहाजिकच जर चांगला बाजार भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना या पिकातून थोडेफार पैसे मिळू शकणार आहेत नाहीतर शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.
अशातच मात्र तूर ऊत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्र शासनाने नाफेड च्या माध्यमातून खुल्या बाजारभावानुसार तूर खरेदीचा निर्णय घेतलेला आहे.
म्हणजेच केंद्र शासनाकडून हमीभावात तुरीची खरेदी होणार नसून बाजारभाव तुरीचे खरेदी होणार आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात कॉम्पिटिशन वाढेल आणि तुरीच्या दराला आधार मिळेल असे सांगितले जात आहे.
व्यापाऱ्यांनी शासनाने तूर खरेदी सुरू केली तर तुरीचे भाव 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात अशी आशा व्यक्त केली आहे.
सध्या स्थितीला मात्र तुरीचे बाजार भाव साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहेत. काल हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रतिक्विंटल किमान ८८०० ते कमाल ९४३० रुपये तर सरासरी ९११५ रुपये दर मिळाले आहेत.
मागील आठवड्याच्या बाजारभावाची तुलना केले असता हा भाव थोडासा सुधारलेला पाहायला मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दराची अपेक्षा आहे.
दरम्यान जाणकारांनी येत्या काही दिवसात तुरीचे भाव 11000 पर्यंत जाणार असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता जाणकारांचा हा अंदाज खरा ठरतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.