Tur Rate : राज्यातील तूर उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्यावर्षी एक डिसेंबर 2023 ला तुरीचे कमाल बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल जवळ होते. मात्र तेव्हापासून सातत्याने बाजारभावात घसरण सुरु होती.
विशेष म्हणजे नवीन तुर बाजारात आल्यानंतर देखील तुरीच्या दरात वाढ होत नव्हती. उत्पादन कमी झाले आहे मात्र तरीही बाजार भाव दबावात असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पाहायला मिळाली.
कमी उत्पादन आणि कमी दर यामुळे तुरीचे पीक कर्जबाजारी बनवणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तर उत्पादकांना गुड न्यूज मिळाली आहे.
जानेवारीचा पहिला पंधरवडा उलटल्यानंतर तुरीच्या बाजार भावात तेजीचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तुरीच्या बाजारभावातील दबाव नाहीसा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता बाजार भावात तेजी येऊ लागली आहे.
तुरीच्या बाजारभावाने दहा हजार रुपयाचा महत्त्वाचा टप्पा आता पार केला आहे. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी भाव वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अर्थातच 19 जानेवारीला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला कमाल दहा हजार 285 रुपयाचा विक्रमी भाव मिळाला. विशेष म्हणजे काल अर्थातच 20 जानेवारी 2024 रोजी बाजारभावातील ही तेजी कायम राहीली.
कालच्या लिलावात अकोला एपीएमसी मध्ये 1855 क्विंटल तूर आवक झाली. यात कमीत कमी ७ हजार ४००, जास्तीत जास्त १० हजार २८५ रूपये आणि सरासरी ९ हजार असा भाव नमूद करण्यात आला आहे.
यामुळे तूर उत्पादकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोल यामुळे बळीराजा पूर्णपणे संतुष्ट बनला आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना फक्त एकरी एक ते दोन क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहेत.
यामुळे तुरीचे बाजार भाव किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल असणे आवश्यक आहे. त्यानुसार आता भाव मिळू लागला असल्याने थोडेफार पैसे संसाराला शिल्लक राहतील अशी आशा आहे.
विशेष म्हणजे आगामी काही दिवसात तुरीचे दर 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचतील, विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हा भाव 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत देखील जाऊ शकतो, असे काही बाजारभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे आता खरंच तुरीचे बाजार भाव 12,000 प्रतिक्विंटल ला टच करणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.