Tur Rate : राज्यातील तूर उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. तूर हे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र विभागातील बहुतांशी जिल्ह्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. मात्र तुरीची विदर्भात सर्वाधिक शेती होते.
या विभागात तूर लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान याच विभागातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तुरीच्या बाजार भावात चांगली सुधारणा झाली आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसूनोत्तर झालेल्या अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे तुरीच्या पिकावर विपरीत परिणाम झाला होता. यामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
अशातच प्रक्रिया उद्योगात तुरीची मागणी वाढत आहे. यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये तुरीची मागणी अधिक आणि आवक कमी असे दृश्य पाहायला मिळत आहे.
हेच कारण आहे की सध्या तुरीच्या बाजार भावाला आधार मिळत असून तुरीच्या बाजारभावाने आता दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विदर्भातील यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9200 ते 10,050 रुपये प्रति क्विंटल या दरात तुरीची विक्री होत आहे.
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात याच एपीएमसी मध्ये तुरीला 7405 ते 8455 म्हणजेच तुरीच्या बाजारभावात गेल्या महिन्याच्या म्हणजे जानेवारी 2024 च्या तुलनेत या एपीएमसी मध्ये 1600 ते 1800 रुपयांची भाव वाढ झाली आहे. यामुळे सध्या तुर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
उत्पादनात आलेली घट विक्रमी दरातून भरून निघेल अशी आशा व्यक्त होत आहे. फक्त यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच नाही तर विदर्भातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील तुरीला चांगला भाव मिळत आहे.
या बाजारात तुरीला 9,400 प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळत आहे. या ठिकाणी किमान 8600 आणि कमाल दहा हजार पंधरा रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे. याशिवाय अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील तुरीला चांगला भाव मिळाला आहे.
येथे 9500 ते 10140 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. शेगाव एपीएमसी मध्ये तुरीला 9000 रुपये प्रति क्विंटल ते 9 हजार 600 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे. अमरावती एपीएमसी मध्ये 9200 ते 9 हजार 901 रुपये प्रतिक्विंटल सभा मिळाला आहे.
तसेच कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9200 ते 10411 प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. एकंदरीत विदर्भात तुरीला विक्रमी दर मिळत असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.