Tur Rate : राज्यात सोयाबीन, कापूस, कांदा या पिकांबरोबरच तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात मात्र सोयाबीन, कापूस आणि कांदा या पिकांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांद्याचे बाजार भाव सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला असल्याने पडले आहेत. डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला गेला.
मार्च महिन्यात कांदा निर्यात बंदी उठवली जाईल असे म्हटले जात होते. मात्र सरकारने निर्यात बंदी ला आता मुदतवाढ दिली आहे. निर्यात बंदी ही जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कायमच राहणार आहे. दुसरीकडे तुरीच्या बाजारभावात विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे.
यामुळे सध्या उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातील अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात तुमच्या दरात विक्रमी वाढ नमूद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आता नागपूर मध्ये देखील तुरीचे भाव कडाडले आहेत. परिणामी आता येथील शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण पाहायला मिळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात तुरीला 9,000 रुपये प्रति क्विंटल ते दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
जेव्हा बाजार भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या वर गेलेत तेव्हा या बाजारात तुरीची आवक देखील वाढली. मात्र नंतर तुरीचे दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आलेत. त्यावेळी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी तुरीची विक्री थांबवली.
यामुळे बाजारभावात मालाचा शॉर्टेज निर्माण झाला आणि परिणामी आता पुन्हा एकदा बाजारभाव सुधारले आहेत. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या मार्केटमध्ये तुरीला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे.
सध्या या बाजारात साडेनऊ हजार रुपये ते 12,000 रुपये असा दर मिळत आहे. प्रक्रिया उद्योगात तुरीची मागणी वाढत असल्याने बाजारभावात सुधारणा होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील टप्प्याटप्प्याने तुरीची विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याने बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक होत नसून याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात याच्या बाजारभावात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांना या भाववाढीचा चांगला दिलासा मिळू लागला आहे.