Tur Rate : तुर उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर खरीप हंगामातील पावसाच्या लहरीपणामुळे तूर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. उत्पादनात घट आली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दुसरीकडे बाजारभाव देखील दबावात आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी बाजारात तुरीला दहा हजारापर्यंतचा भाव मिळत होता. सध्या मात्र तुरीचे बाजार भाव खूपच कमी आहेत. सध्या तुरीचे कमाल बाजार भाव 9,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहेत.
सरासरी बाजारभाव मात्र यापेक्षा कमी आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने किरकोळ बाजारातील तूर डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुर आयात केली. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत तुरीची उपलब्धता वाढली आहे.
बाजाराच्या समीकरणांनुसार मालाची उपलब्धता अधिक आणि मागणी सामान्य असली तर बाजारभावाला उठाव मिळत नाही. सध्या असेच काहीसे तुरीच्या बाबतीत घडत आहे. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कारण की, यामुळे किरकोळ बाजारात तुरीचे दर 130 रुपये प्रति किलोच्या घरात आहेत. नाहीतर तुरीचे दर किरकोळ बाजारात याहीपेक्षा अधिक पाहायला मिळाले असते. मात्र शासनाचा हा निर्णय उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान करू पाहत आहे. पण आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
कारण की तुरीचे भाव वाढतील अशी आशा आहे. केंद्र शासनाने नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून खुल्या बाजारातील बाजार भावात तूर खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.
म्हणजेच यंदा केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सात हजार रुपये प्रतिक्विंटल या हमीभावापेक्षा अधिकच्या दरात शासनाच्या माध्यमातून तूर खरेदी होणे अपेक्षित आहे. नाफेडकडून बाजारभावात तुरीची खरेदी होणार असून यासाठी नाफेड रोज नवीन भाव जाहीर करणार आहे.
यामुळे काही व्यापाऱ्यांनी आणि तुर बाजारातील अभ्यासकांनी लवकरच तुरीचे बाजार भाव 11,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचतील अशी आशा व्यक्त केली आहे.
म्हणजेच तुरीच्या बाजार भावात दोन हजार रुपयांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे आता व्यापाऱ्यांचा आणि तज्ञांचा हा अंदाज खरा ठरतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
तथापि उत्पादनात आलेली कमी आणि शासनाने बाजारभावातील खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय पाहता तुरीचे बाजार भाव 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील असे बोलले जात आहे.