Tur Rate : तुर उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरेतर तूर हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. याची शेती खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. तुरीचे लागवडीखालील क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे. मात्र सध्या स्थितीला तुरीचे भाव दबावत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तुरीचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. सध्या स्थितीला मात्र बाजारभावावर मोठा दबाव पाहायला मिळत आहे.
याचा परिणाम म्हणून उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यावर्षी खरीप हंगामात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे साहजिकच सोयाबीन, कापूस, तूर अशा इत्यादी पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.
एकीकडे कमी पावसामुळे आणि वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले आहे तर दुसरीकडे तुरीचे दर गेल्या काही महिन्यांपासून दबावत आहेत.
याचा परिणाम म्हणून आता शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येणार नाही असे चित्र तयार झाले आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून भविष्यात तुरीचे बाजार भाव सुधारणार की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात तुरीची आवक वाढणार अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे संक्रांत नंतर आणखी आवक वाढणार अशी आशा आहे.
याचा परिणाम म्हणून सध्या स्थितीला तुरीच्या बाजारभावावर दबाव पाहायला मिळत आहे. आज देखील बाजारभावात थोडीशी नरमाई दिसून आली आहे.
आज तुरीला देशातील अनेक प्रमुख बाजारात 8300 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान भाव मिळाला आहे. मात्र असे असले तरी बाजार अभ्यासाकांनी आगामी काही दिवसात तुरीच्या बाजारभावात वाढ होईल, बाजारातील नरमाई आता दूर होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
तुर बाजारातील अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात झालेल्या कमी पावसामुळे यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तसेच स्टाॅकीस्टची खरेदी आणि सरकारची बाजारभावाने खरेदीचा सुद्धा तूर बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते. यामुळे आता तुरीच्या बाजारभावात किती सुधारणा होणार पुन्हा एकदा तुरीचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.