Tur Rate : गेल्या काही महिन्यांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी मान्सून काळात राज्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यात खूपच कमी पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांमधून अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
सोयाबीन, कापूस, तूर अशा सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आली. विशेष म्हणजे बाजारात सोयाबीन आणि कापसाला चांगला भावही मिळत नाहीये. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे.
यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकरी कर्जबाजारी होतील असे मत आता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांकडून व्यक्त केले जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे तुरीला मात्र बाजारात चांगला भाव मिळतोय. तुरीच्या उत्पादनात आलेली मोठी घट आणि वाढती मागणी यामुळे तुरीच्या बाजारभावात सुधारणा होत आहे.
मध्यंतरी तुरीचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी झाले होते. आता मात्र पुन्हा एकदा बाजार भावात सुधारणा होत आहे.
तुरीचे कमी उत्पादन, वाढलेली मागणी आणि शासनाने खुल्या बाजारभावात तुर खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय या साऱ्या पार्श्वभूमीवर आता बाजारभावात सुधारणा होत असल्याचे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे काल अर्थातच 2 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या लिलावात राज्यातील एका मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या बाजारभावाने साडेदहा हजाराचा टप्पा पार केला आहे.
कुठं मिळाला विक्रमी भाव
हाती आलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला विक्रमी भाव मिळाला आहे. या बाजारात गेल्या काही दिवसांपासून तुरीचा तोरा वाढतच आहे.
दरम्यान काल, शुक्रवारी तुरीच्या बाजार भावाने साडेदहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या एपीएमसी मध्ये काल अर्थातच 2 फेब्रुवारीला तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ५९१ इतका उच्चांकी दर मिळाला आहे.
या मार्केटमध्ये सध्या तुरीची दररोज सर्वसाधारणपणे पाचशे कट्ट्यांच्या घरात आवक होत आहे. दरम्यान बाजारभावात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायी ठरली आहे. यामुळे उत्पादनात आलेली घट भरून निघेल अशी आशा आहे.