Tur Market Price : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस या मुख्य पिकासमवेत तुरीची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. तूर लागवडीखालील क्षेत्र आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. यंदा मात्र तुरीच्या उत्पादनात जवळपास 50 टक्क्यांपर्यंत घट येणार अशी भीती काही तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे तुर पिकावर आलेल्या वेगवेगळ्या किटकामुळे आणि रोगांमुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती यावेळी तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
सध्या स्थितीला मात्र तूर उत्पादक शेतकरी या चालू हंगामातील तुरीची मोठ्या प्रमाणात काढणी करत आहेत. विशेष म्हणजे हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बांधव लगेचच तुरीची बाजारात विक्री देखील करू लागले आहेत.
शेतकऱ्यांना पैशांची निकड असल्याने बहुतांशी शेतकरी बांधव तुरीची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्याबरोबर लगेचच विक्री करण्याला पसंती दाखवत आहेत. दरम्यान अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील नवीन तुरीची आवक वाढू लागली आहे.
विशेष म्हणजे बाजारात नवीन तुरीची आवक होत आहे.पण बाजारभाव अजूनही दबावात आहेत. तुरीचे सरासरी दर 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहेत.
पण गेल्या काही दिवसांपूर्वी तुरीचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक नमूद केले जात होते. सरासरी बाजारभाव देखील 10 हजाराच्या जवळच होते. यामुळे सध्याचे बाजारभाव हे दबावात असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अर्थातच सहा जानेवारी 2024 रोजी झालेल्या लिलावात तुरीला किमान 6 हजार 820 रुपये प्रति क्विंटल, कमाल 9320 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 8 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून परदेशातून तुरीची आयात सुरू असल्याने सध्या देशांतर्गत तुरीची उपलब्धता अधिक प्रमाणात पाहायला मिळत असून याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान सध्या स्थितीला तुरीची काढणी नुकतीच सुरू झाली आहे. यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात तुरीची हार्वेस्टिंग होणार आहे. परिणामी बाजारात तुरीची आवक वाढणार यात शंकाच नाही.
यामुळे आवक वाढल्यानंतर तुरीला काय दर मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. व्यापाऱ्यांच्या मते आत्तापासूनच भविष्यात तुरीला काय भाव मिळणार याबाबत माहिती देता येणे अशक्य आहे.