Tur Farming : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून विविध पिकांचे वाण विकसित करण्यात आले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढले आहे. राज्यात तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील राज्यातील कृषी विद्यापीठांनी विविध जाती विकसित केलेल्या आहेत.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या (VNMKV) बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी असाच एक तुरीचा वाण विकसित केला असून या जातीच्या तुरीमुळे या विभागातील शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने गोदावरी हा तुरीचा नवा वाण विकसित केला असून या जातीमुळे मराठवाड्यातील तूर उत्पादकांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. खरे तर हा वाण अजून पेटंटच्या प्रोसेस मध्ये आहे.
मात्र असे असले तरी या जातीपासून दुप्पट उत्पादन मिळत असल्याने ही जात शेतकऱ्यांच्या पसंतीस खरी उतरली असून या जातीची मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याची माहिती समोर येत आहे. बदनापूर तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने तुरीची मुख्य पीक म्हणून आणि या पिकात सोयाबीन आंतरपीक म्हणून लागवड केली.
या शेतकऱ्याला आता तुरीच्या या जातीपासून तब्बल 12 क्विंटल तूर उत्पादन मिळणार अशी आशा आहे. बदनापूर येथील वाहेगावचे बळीराम काळे यांनी या जातीच्या लागवडीतून ही किमया साधली आहे. काळे यांनी सांगितल्याप्रमाणे ते गेल्या चार वर्षांपासून या जातीच्या तुर पिकाची लागवड करत आहेत.
चारही वर्षी त्यांना या जातीचे वेगवेगळे अनुभव आले आहेत कारण की त्यांनी वेगवेगळ्या जमिनीमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुरीची लागवड केलेली आहे. काळे यांनी ही जात मर रोगास प्रतिकारक असल्याचे म्हटले असून जास्त पाणी झाले तरीदेखील या जातीच्या तुर पिकावर कोणताच विपरीत परिणाम होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ते सांगतात की, त्यांनी चोपण, हलक्या अन काळ्या जमिनीत या वाणाची टप्प्याटप्प्याने लागवड केली होती. यातून वेगवेगळा उतारा त्यांना मिळाला. काळे यांनी गेल्या वर्षी सहा फुटावर तुरीची लागवड केली होती आणि यात सोयाबीनचे आंतरपीक घेतले त्यातून त्यांना 9 क्विंटल तूर आणि सहा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले.
यंदा त्यांनी काळ्या जमिनीत तुरीची लागवड केली. ८ फुटावर तूर लागवड केली आणि सोयाबीनचे आंतरपीक घेतले तर त्यांना सोयाबीन ८ क्विंटल आणि तुरीचे उत्पादन हे १२ क्विंटल निघण्याची अपेक्षा आहे.
म्हणजेच लागवड पद्धतीमुळे सुद्धा उतारा कमी जास्त होतो. पण तुरीची ही जात अधिक उत्पादन देणारी आहे. जर या जातीची निवड केली आणि योग्य लागवड पद्धतीने याची लागवड केली गेली तर शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होणार आहे.