Tur Crop Management : महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारख्या विविध पिकांची लागवड केली जाते. तूर लागवडीचा विचार केला तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तुरीचे लागवडीखालील क्षेत्र पाहायला मिळते.
मराठवाडा आणि विदर्भात तुर लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील तुरीचे लागवडीखालील क्षेत्र विशेष आहे. या विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे तुर पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असल्याने काढणीसाठी तयार झालेल्या तुर पिकावर शेंगा पुकारणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पायाला मिळत आहे. पीक ऐन अंतिम टप्प्यात आले असताना पिकावर शेंगा पोखारणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार असा दावा केला जात आहे.
परिणामी तुर उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीवर योग्य पद्धतीने आणि वेळेत नियंत्रण मिळवावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण तुर पिकावर आलेल्या या घातक अळीचा कशा तऱ्हेने नायनाट केला जाऊ शकतो याविषयीचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेंगा पोखरणाऱ्या अळीवर कसे मिळवणार नियंत्रण?
तुर हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. सध्या या पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश अशा विविध विभागांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव पायाला मिळत आहेत.
यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटू शकते असा अंदाज आहे. परिणामी या कीटकाच्या नियंत्रणासाठी पिकात कामगंध सापळे अर्थातच फेरोमोन ट्रॅप्स बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पिकात एकरी ५ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) बसवले पाहिजेत असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
तसेच पक्षी थांबा बसवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. खरंतर शेंगा पोखरणाऱ्या अळ्याना पक्षी खात असतात. यामुळे या अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे बसवले पाहिजेत असा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच या अळीच्या जैविक नियंत्रणासाठी पीक कळी अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी केली पाहिजे असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे.
याशिवाय या किटकावर रासायनिक पद्धतीने देखील नियंत्रण मिळवले जाऊ शकते. कृषी तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पिकात किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर झाला असेल तर याच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषधांची फवारणी केली पाहिजे.
यासाठी इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के एस. जी. ४ ग्रॅम किंवा क्लोरॉन्ट्रानिलिप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली. इंडोक्साकार्ब १४.५ एस. सी. ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला यावेळी कृषी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.