Tree Farming : भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये (Farming) वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे चित्र आहे. अलीकडे शेतकरी बांधव काही झाडांची व्यावसायिक शेती (Tree Commercial Farming) करत आहेत.
तसेच काही शेतकरी बांधव शेतजमिनीच्या बांधावर काही झाडांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे या झाडांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना करोडो रुपयांची कमाई (Farmer Income) होत असल्याचा दावा केला जातो.
आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी अशाच काही झाडांची माहिती घेऊन आलो आहोत त्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना 100 टक्के करोडो रुपयांची कमाई होऊ शकणार आहे.
मित्रांनो आज आपण निलगिरी, शिवण तसेच महोगणी या तीन झाडांच्या शेती विषयी काही महत्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
निलगिरी शेती (Eucalyptus Farming) :- फर्निचर, इंधन आणि कागदाचा लगदा तयार करण्यासाठी सुरक्षित लाकडाचा वापर केला जातो. तज्ञांच्या मते, एक हेक्टर क्षेत्रात 3000 हजार निलगिरीची रोपे लावता येतात. हे झाड केवळ 5 वर्षांत चांगले विकसित होते, त्यानंतर ते कापले जाऊ शकते. एक हेक्टरमध्ये लागवड करून शेतकरी 70 लाख ते एक कोटी रुपयांचा नफा सहज कमवू शकतो.
महोगनी लागवड (Mahogany Farming) :– महोगनीच्या झाडापासून चांगल्या दर्जाचे लाकूड मिळवण्यासाठी 12 वर्षे लागतात. त्याच्या लाकडाची पाने आणि साल अनेक गंभीर रोगांवर वापरले जातात. त्याच्या पानांचे आणि बियांचे तेल डासांपासून बचाव करणारी उत्पादने आणि कीटकनाशके बनवण्यासाठी वापरले जाते. त्याचे बियाणे एक हजार रुपये किलोपर्यंत बाजारात विकले जाते.
सागवान लागवड (Teak Farming):- शेतकरी सांगवालच्या झाडांची 12 वर्षात कापणी करू शकतात. 1 सागवान झाड एकदा कापले की पुन्हा वाढते आणि पुन्हा कापता येते. एका एकरात 500 सागवान झाडे लावली तर 12 वर्षांनंतर त्याची किंमत करोडोंची होईल.