Tree Farming: भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव (Farmer) आता शेतीमध्ये (Agriculture) वेगवेगळ्या पिकांची शेती करत आहेत. खरं पाहता वेगवेगळ्या झाडांची देखील आता मोठ्या प्रमाणात लागवड (Tree Cultivation) केली जात आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील झाडांची शेती करून चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) करत आहेत.
आता शेतकरी बांधव साग, महोगणी, चंदन यांसारख्या झाडांची शेती करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी महोगणी या झाडाच्या शेतीविषयक (Mahogany Farming) काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत. जाणकार लोकांच्या मते, महोगणीचे झाड लागवड करण्यापासून बारा वर्षानंतर यातून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. महोगणीच्या झाडाचे लाकूड तसेच पाने देखील बाजारात चढ्या किमतीने विकली जातात. यामुळे याची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे.
मित्रांनो महोगणी झाडाच्या वाढीसाठी सुपीक माती, चांगला निचरा होणारी शेतीजमीन योग्य असल्याचा दावा केला जातो. सामान्य पीएच असलेल्या शेतजमिनीत याची शेती करणे अतिशय फायद्याचे ठरत असल्याचे सांगितले जात आहे. महोगणी झाडाचे लाकूड अतिशय मजबूत असल्याने या लाकडाचा जहाजे, दागदागिने, फर्निचर, प्लायवूड, सजावट आणि शिल्पे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो.
या झाडाच्या लाकडाची अजून एक मोठी विशेषता म्हणजे या झाडाचे लाकूड लवकर खराब होत नाही आणि अनेक वर्षे टिकते. यामुळे या झाडाच्या लाकडाला बाजारात बारामाही मागणी असते. निश्चितच बाजारात या झाडाच्या लाकडाला चांगला बाजार भाव देखील मिळतो. या परिस्थितीत या झाडाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे.
मात्र असे असले तरी जाणकार लोक महोगणी लागवडीत काही बाबींची काळजी घेण्याचा देखील सल्ला देतात. जाणकार लोकांच्या मते, महोगनी झाड अशा ठिकाणी लावू नये, जेथे वाऱ्याचा प्रवाह जोरदार असेल. म्हणजेच ज्या भागात वादळी वारे वाहतात तसेच उंचीवर असलेल्या ठिकाणी किंवा डोंगराळ भागात याची शेती करू नये.
या झाडाजवळ डास येत नाहीत
या झाडाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, महोगनीच्या झाडांजवळ डास आणि कीटक येत नाहीत. यामुळेच याच्या पानांचे आणि बियांचे तेल डासांपासून बचाव करणारे पदार्थ आणि कीटकनाशके बनवण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती जाणकार लोक देत असतात. याशिवाय महोगणी झाडापासून मिळणारे तेल साबण, रंग, वार्निश आणि अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी वापरले जाते. त्याची साल आणि पाने अनेक रोगांवर देखील वापरली जातात. त्यामुळे या झाडाची शेती खूपच फायदेशीर ठरते.
महोगनी झाड 12 वर्षांत उत्पादन देण्यासाठी तयार होते. म्हणजेचं याचे लाकूड 12 वर्षानंतर कापले जाते आणि त्यापासून उत्पन्न मिळवतात. जाणकार लोकांच्या मते महोगणी झाडापासून मिळणारे बियाणे एक हजार रुपये किलोपर्यंत बाजारात विकले जाते. त्याच वेळी, त्याचे लाकूड 2000 ते 2200 रुपये प्रति घनफूट पर्यंत बाजारात विकले जाते. अशा परिस्थितीत या झाडाची लागवड करून शेतकरी बांधव लाखो रुपयांची कमाई करू शकतात. मात्र यासाठी शेतकरी बांधवांना बारा वर्षेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.