Tree Farming : भारतात अलीकडे शेती व्यवसायात (Farming) मोठा बदल केला जात आहे. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात (Agriculture) बदल करण्यास प्रोत्साहित करीत आहेत.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक पिके (Traditional Crops) सोडून इतर फळे, फुले, भाजीपाला आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीत अधिक रस दाखवत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पीकपद्धतीत बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस नफाही (Farmer Income) मिळत आहे.
मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील आता पीक पद्धतीत बदल करत असून मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची शेती करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फळबागाची लागवड करत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी काही फळबाग पिकांच्या शेती विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
पपई लागवड : जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पिकाची रोपे लावल्यानंतर दर 9 ते 11 महिन्यांनी या रोपाला फळे लागत असतात. मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, या झाडाची उंची 20-25 फूटपर्यंत असते. या झाडाची पाने औषधी वनस्पती म्हणून देखील वापरली जातात.
पपईची फळे लोक मोठ्या आवडीने खातात. पपईचे सेवन अनेक रोगांवर फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत बाजारात त्याची किंमत नेहमीच चांगली राहते. यामुळे या पिकाची लागवड देखील शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणार आहे.
लिंबू लागवड :- लिंबाची मागणी वर्षभर बाजारात राहते. गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी लिंबाला ऐतिहासिक बाजार भाव मिळाला होता. यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी चांगलेच मालामाल झाले होते. त्याचे झाड एकदा लावले की ते अनेक वर्षे उत्पादन देत राहते.
ते व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. अशा परिस्थितीत बाजारात याला कायम मागणी असते. विशेषता उन्हाळी हंगामात लिंबू ला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळेच लिंबाची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतो.
केळीची शेती :- देशात केळीची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जाते. आपल्या राज्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. राज्यातील खानदेश प्रांतात केळीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. आता टिश्यू कल्चरद्वारेही त्याची लागवड केली जात आहे.
या तंत्राने लागवड केल्यास केळी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. याच्या फळांसोबतच पानांनाही मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत केळीची शेती शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणार आहे.
बोर लागवड:- याची सर्व फळे वेगवेगळ्या वेळी पिकतात, त्यामुळे अनेक वेळा त्यांची कापणी आणि विक्री करता येते. सुरुवातीला ही फळे आंबट आणि हिरवी रंगाची असतात, पण पिकल्यानंतर त्यांचा गोडवा वाढतो. हे वाजवी दरात बाजारात विकले जातात.
पेरूची लागवड:- अलीकडे आपल्या देशात पेरू लागवड विशेष वाढली आहे. नवीन पेरूच्या बागा लावण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी त्यांना अनुदानही दिले जात आहे. ही झाडे 2 ते 6 वर्षे फळ देत राहतात. शिवाय बाजारात पेरूला कायम मागणी असल्याने त्याची लागवड करून शेतकरी भरघोस नफा कमावत आहेत.