Tree Farming : देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता पारंपारिक शेती (Farming) सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. देशातील शेतकरी आता अधिकाधिक फायदा देणाऱ्या नगदी पिकाच्या (Cash Crops) शेतीकडे वळत आहेत.
राज्यात देखील आता शेतकरी बांधव नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. अलीकडे देशातील शेतकऱ्यांमध्ये झाडांची लागवड खूप लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे झाडांची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगलीच फायद्याची ठरत आहे. निलगिरी (Nilgiri Tree) हे देखील असंच एक झाड आहे.
निलगिरी झाडांची व्यवसायिक शेती (Nilgiri Tree Farming) करून शेतकरी काही वर्षांतचं लाखोंचे उत्पन्न कमवणार आहेत. जाणकार सांगतात की निलगिरी शेतीतुन (Eucalyptus Farming) 60 लाखापर्यंत सुद्धा नफा आरामात कमवला जाऊ शकतो.
निलगिरी शेतीत संयम बाळगण्याची नितांत गरज आहे
निलगिरी लाकडाचा उपयोग फर्निचर, इंधन आणि कागदाचा लगदा बनवण्यासाठी केला जातो. मात्र, त्याची लागवड करताना शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. त्याचे रोप लावताच तुमचा नफा अनेक पटींनी वाढेल असे नाही. ही वनस्पती साधारण 5 ते 6 वर्षात चांगले विकसित होते. मग शेतकऱ्यांना यातून कमाई होण्यास सुरवात होते.
निलगिरी शेतीसाठी किती तापमान आवश्यक आहे बर…!
ज्या भागात तापमान 30 ते 35 अंशांच्या आसपास असते अशा भागात निलगिरी या पिकाची रोपे लावली तर निलगिरीच्या झाडांचा चांगला विकास होतो आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. तसेच शेतकरी बांधवांना ज्या शेतात निलगिरीची रोपे लावायची आहेत त्या शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी असा सल्ला दिला जातो. निलगिरी झाडाच्या वाढीसाठी, चिकणमाती असलेली जमिन सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. अशा जमिनीत या झाडाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळणार आहे.
पेरणीपूर्वी हे एक काम करावं लागणार बर…!
निलगिरी झाडाचे रोप लावण्यापूर्वी शेतीची चांगली नांगरणी करावी लागणार आहे. शेतीची चांगली नांगरणी केल्यानंतर जमीन चांगली समतल करावी. शेत समतल केल्यानंतर 5 फूट अंतरावर एक फूट रुंदीचे व खोलीचे खड्डे तयार करावे लागणार आहे. या खड्ड्यात निलगिरीची रोपे लावली जातात. प्रत्येक रांगेत 5 ते 6 फूट अंतर ठेवावे लागते.
एक हेक्टरमध्ये 3 हजार रोपेलावली जातात बर…!
कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधव आपल्या एक हेक्टर क्षेत्रात 3000 हजार निलगिरीची रोपे सहज लावू शकतात. मित्रांनो निलगिरीची रोपे लावली जातात जी की नर्सरीतून अगदी सहज 7 किंवा 8 रुपयांना एक रोपं याप्रमाणे मिळतात. अशा परिस्थितीत निलगिरी झाडाच्या लागवडीसाठी केवळ 21 हजार ते 30 हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. याशिवाय निलगिरी झाडाची देखभाल व सिंचनावर दरवर्षी 20 ते 30 हजार रुपये खर्च होणे अपेक्षित आहे.
निलगिरी शेतीतून बंपर नफा मिळणार बर…!
तज्ञ लोक सांगतात की निलगिरीच्या एका झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळत असते. रिपोर्टनुसार बाजारात निलगिरीचे लाकूड 6 ते 9 रुपये प्रति किलो दराने विकले जाते. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांनी आपल्या एक हेक्टर शेतीजमिनीत तीन हजार निलगिरीची झाडे लावली तर शेतकरी बांधवांना जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत कमाई होणार असल्याचा दावा केला जात आहे.