Tractor Subsidy : शेतकरी बांधवांच्या आणि गरीब जनतेच्या कल्याणासाठी सरकार दरबारी कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदानाचे देखील प्रावधान असते.
अशीच एक शेतकरी हिताची योजना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे याच्या साधनांवर देखील अनुदानाचे प्रावधान आहे.
या योजनेचा लाभ घेणे हेतू 23 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे. खरं पाहता स्वयंसहायता बचत गटांना त्यांचे उत्पन्न वाढवता यावे यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर वर 90 टक्के अनुदान यासाठी कमाल मर्यादा मात्र 3.15 लाख आहे. स्वयंसहायता बचत गटांनी आपल्या हिस्साचीं दहा टक्के रक्कम भरल्यानंतर लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या विहित नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे देखील आढे यांनी सांगितले आहे.
या योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे
सदर बचत गटातील सदस्य हे राज्याचे रहिवासी असावेत ही एक मुख्य अट आहे. तसेच अर्जदार बचत गटातील ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतीलचं राहणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखले सादर करावे लागतात. तसेच ज्या लोकांना तत्सम योजनेचा आधीच लाभ मिळाला आहे ते ह्या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.