Tractor News : काळाच्या ओघात भारतीय शेतीत मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळतोय. आता भारतीय शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे. यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात शेतीची कामे केली जाऊ लागली आहेत. पूर्व मशागतीपासून ते पिकांच्या हार्वेस्टिंग पर्यंत सर्वत्र ट्रॅक्टरचा उपयोग होत आहे. विशेष म्हणजे फवारणीसाठी देखील आता ट्रॅक्टरचा वापर केला जातो.
फळबागायतदार शेतकरी बांधव फवारणीच्या कामांसाठी छोट्या ट्रॅक्टरचा अधिकाधिक वापर करत आहेत. डाळिंब, द्राक्ष यांसारखे फळबागायतदार छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी आणि इतर अंतर्मशागतीची कामे करतात.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात छोटे ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील एका लोकप्रिय मिनी ट्रॅक्टरची माहिती पाहणार आहोत. खरे तर अनेकांना फोर व्हिल ड्राईव्ह ट्रॅक्टर पण हवा असतो आणि चांगले मायलेज देखील हवे असते.
मात्र जे मिनी ट्रॅक्टर फोरव्हील ड्राईव्ह असतात त्यांना फारसे मायलेज नसते. पण, आज आपण अशा एका ट्रॅक्टरची माहिती जाणून घेणार आहोत जे की फोर व्हील ड्राईव्ह देखील आहे आणि विशेष म्हणजे चांगले मायलेज देण्यासाठी सक्षम आहे.
कोणते आहे ते ट्रॅक्टर?
हे ट्रॅक्टर आहे जॉन डीअर कंपनीचे. John Deere 3028 EN हे ट्रॅक्टर मायलेज साठी सर्वोत्कृष्ट आहे शिवाय याला फोर व्हिल ड्राइव्हचा ऑप्शन देखील मिळतो. त्यामुळे फळबागायतदार शेतकऱ्यांमध्ये हा ट्रॅक्टर खूपच लोकप्रिय झाला आहे.
हा आकाराने छोटा आहे, इंजिन देखील खूपच कॉम्पॅक्ट आहे पण पॉवरच्या बाबतीत हा भल्याभल्यांना घाम फोडणारा आहे. या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडरचे 28 एचपी चे इंजिन आहे. जे की 900 किलो पेक्षा अधिकचे वजन उचलण्यास सक्षम आहे.
विशेष म्हणजे याचे इंजिन हे कमी एचपीचे असतानाही हा ट्रॅक्टर फोरव्हील ड्राईव्हच्या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यामुळे या ट्रॅक्टरला अलीकडे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. या ट्रॅक्टरची किंमत देखील शेतकऱ्यांच्या बजेटमध्येच आहे.
हे ट्रॅक्टर 7.10 ते 7.5 लाख रुपये किंमतीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ट्रॅक्टरमध्ये सिंगल क्लच आणि पावर स्टेरिंग देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरवर कंपनीकडून 5000 तास किंवा पाच वर्षांची वॉरंटी दिली जाते.
हा मिनी ट्रॅक्टर आकाराने छोटा असला तरी देखील शेतीकामांसाठी इतर मोठ्या ट्रॅक्टरला देखील लाजवणारा आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे सहजतेने पूर्ण करता येतात.
सर्व प्रकारच्या शेती कामांसाठी हा ट्रॅक्टर उपयोगाचा ठरतो. नक्कीच ज्या शेतकऱ्यांना छोटा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.