Tractor Mileage : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातल्या शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळतोय. आता शेतीचा व्यवसाय हा आधीच्या तुलनेत अधिक सोपा झाला आहे. पूर्वी शेती व्यवसायात शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र काळाच्या ओघात शेतीमध्ये यंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
कृषी तंत्रांमुळे आणि यंत्रांमुळे शेतीचा व्यवसाय आधीच्या तुलनेत अधिक सोपा झाला आहे. ट्रॅक्टर सारख्या यंत्रांमुळे मजूर टंचाईवर यशस्वीरित्या मात करता येत आहे. ट्रॅक्टरमुळे घंटो का काम मिनिटो में करता येणे शक्य झाले आहे.
दरम्यान जर तुम्हीही शेती कामांसाठी ट्रॅक्टर वापरत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण ट्रॅक्टरचे मायलेज कशा पद्धतीने वाढवले जाऊ शकते, ट्रॅक्टरचे मायलेज वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? याबाबत माहिती पाहणार आहोत.
ट्रॅक्टरचे मायलेज वाढवण्यासाठी काय करावे
खरंतर, सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. शेतीमध्ये देखील विविध तंत्रज्ञान आणि यंत्रांचा शिरकाव झाला आहे. ट्रॅक्टर हे यंत्र याचे एक उत्तम उदाहरण आहे. या यंत्रामुळे शेतीचा व्यवसाय सोपा झाला आहे. मात्र अनेक शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर कमी मायलेज देत असल्याची तक्रार करतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला ट्रॅक्टरचे मायलेज वाढवण्या साठी काही टिप्स सांगणार आहोत.
1) ट्रॅक्टरच्या टायरची हवा कमी झाली तर मायलेज वर परिणाम होतो. यामुळे नेहमीच ट्रॅक्टरच्या टायरची हवा चेक करत राहिले पाहिजे. ट्रॅक्टरच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा राहिली तर तुमचे ट्रॅक्टर नक्कीच चांगले मायलेज देणार आहे.
2) ट्रॅक्टरचे मायलेज वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरची सर्विसिंग वेळेवर करणे आवश्यक आहे. अनेकजण ट्रॅक्टरची सर्विसिंग वेळेवर करत नाहीत आणि यामुळे मायलेज वर परिणाम होतो.
3) ट्रॅक्टर चालवताना देखील योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही अचानक ट्रॅक्टरला एक्सीलेरेट करत असाल किंवा ट्रॅक्टर अचानक ब्रेक दाबून स्लो करत असाल तर अशावेळी तुमच्या ट्रॅक्टरच्या मायलेज वर परिणाम होऊ शकतो. यामुळे ट्रॅक्टर चालवताना याही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
4) ट्रॅक्टर चालू असेल आणि तुम्हाला मध्येच ट्रॅक्टर थांबवायचे असेल तर अशावेळी ट्रॅक्टरचे इंजिन बंद करायला विसरू नका. जर तुम्ही ट्रॅक्टर थांबवलेलेच असेल आणि इंजिन देखील सुरूच असेल तर अशा प्रकरणांमध्ये तुमच्या ट्रॅक्टरच्या मायलेज वर परिणाम होण्याची शक्यता असते.
5) जर तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरने चांगले मायलेज द्यावे असे वाटत असेल तर त्याचे एअर फिल्टर वेळोवेळी बदलत रहा. तसेच एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. जेव्हा एअर फिल्टर पूर्णपणे निकामी होते तेव्हा ते बदलून नवीन एअर फिल्टर टाका.
6) ट्रॅक्टरचे अलाइनमेंट देखील योग्य वेळी होणे आवश्यक आहे. अलाइनमेंट जर बरोबर नसेल तर ट्रॅक्टरच्या मायलेज वर परिणाम होणार आहे. यामुळे ट्रॅक्टरचे अलाइनमेंट वेळोवेळी करत रहा.