Tractor Anudan Yojana : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
बळीराजाला आपल्या शेतीमधून कशा पद्धतीने अधिकचे उत्पादन मिळवता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकरिता यांत्रिकीकरणाच्या वापराला प्रोत्साहित केले जात आहे.
विशेष म्हणजे यांत्रिकीकरणासाठी शासनाकडून अनुदान देखील पुरवले जात आहे.केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची माहिती वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% एवढे अनुदान दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.
केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली ही योजना देशातील सर्व राज्यांमध्ये सुरू असून अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50% एवढे अनुदान मिळत असल्याचा दावा या सोशल मीडिया मधील व्हायरल पोस्टमध्ये केला जात आहे.
अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून खरंच पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे का ? हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान या योजनेबाबतची माहिती जाणून घेतली असता असे समोर आले आहे की केंद्र शासनाने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही.
त्यामुळे सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असलेले हे वृत्त साफ खोटे आहे. अशा बनावट योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते.
त्यामुळे जर सोशल मीडियावर पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेची बनावट लिंक आढळली तर त्यावर क्लिक करू नये असे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. एकंदरीत केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना अशी कोणतीच योजना सुरू केलेली नाही.
मात्र देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारांनी तेथील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून अनुदान पुरवले जात आहे. मात्र हे अनुदान 50 टक्के मर्यादेत पुरवले जात नाही.
तसेच महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर साठी 90 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी त्या योजनेची पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्यासोबत मोठी फसवणूक होऊ शकते.