Tomato Variety : टोमॅटो हे एक प्रमुख भाजीपाला पिक आहे. टोमॅटोला बाजारात बारा महिने मागणी पाहायला मिळते. प्रक्रिया उद्योगात देखील टोमॅटोला मोठी मागणी आहे. टोमॅटो पासून विविध बाय प्रॉडक्ट तयार केले जातात. यामुळे प्रक्रिया उद्योगात टोमॅटोला नेहमीच मागणी असते. परिणामी शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पन्न मिळत आहे.
मात्र काही प्रसंगी अक्षरशः पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. दरम्यान जर तुम्ही यंदाच्या खरीप हंगामात म्हणजेच पावसाळ्यात टोमॅटो लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.
खरे तर जर खरीप हंगामात टोमॅटोची लागवड करायची ठरली तर यासाठी मे किंवा जून महिन्यात रोपवाटिका तयार करावी लागते. यानंतर मग जून ते जुलै या कालावधीमध्ये या रोपांची लागवड केली जाते.
अशा परिस्थितीत आज आपण खरीप हंगामात लागवडीसाठी टोमॅटोच्या सुधारित जाती कोणत्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टोमॅटोच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
धनश्री : खरीप हंगामात लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट वाण म्हणून या जातीला ओळखले जाते. ही एक मध्यम वाढणारी जात आहे. जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी हा वाण योग्य असल्याचे आढळून आले आहे.
या जातीपासून हेक्टरी 50 टन पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. या जातीचे पीक 160 ते 165 दिवसात परिपक्व होते. विशेष म्हणजे फळ पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास ही जात प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
फुले राजा : या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा 180 दिवसाचा आहे. या जातीचे टोमॅटो लांबच्या बाजारपेठेसाठी योग्य आहेत. या जातीपासून हेक्टरी 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. टोमॅटोची ही देखील जात फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक असल्याचे आढळले आहे.
फुले केसरी : या जातीच्या टोमॅटोची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. या जातीची खरीप हंगामात लागवड केल्यास अधिकचे उत्पादन मिळते. या जातीच्या टोमॅटोचा रंग केसरी असल्याने या जातीला फुले केसरी म्हणून ओळखले जाते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने ही जात विकसित केली आहे. या जातीपासून एव्हरेज 55 ते 57 एवढे विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा संशोधकांनी केलेला आहे.