Tomato Top 3 Variety : टोमॅटो हे खरीप म्हणजे पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. जर तुम्हालाही टोमॅटो लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आम्ही तुम्हाला टोमॅटोच्या टॉप तीन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायटीची माहिती सांगणार आहोत. आज आपण ज्या टोमॅटोच्या जातींची माहिती पाहणार आहोत त्या जाती एकरी 2200 ते 5000 कॅरेट एवढे उत्पादन देण्यासाठी सक्षम आहेत.
खरे तर कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक असते. जर तुम्हालाही टोमॅटो पिकातून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर याचा सुधारित जातींची, व्हरायटींची लागवड करावी लागणार आहे.
टोमॅटोच्या टॉप तीन व्हरायटी
आरडोर सीड्स कंपनीचे गुरु : आरडोर सीड्स कंपनीचे गुरु हे टोमॅटोचे एक प्रमुख वाण आहे. ही व्हरायटी शेतकऱ्यांमध्ये खूपच फेमस आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे. या जातीचे टोमॅटो कडक असतात. याची लागवड केल्यास टोमॅटो क्रॅक होण्याची समस्या दिसणार नाही.
ही व्हरायटी गावरान सेगमेंट मधली आहे. जर तुम्ही या व्हरायटीची लागवड करत असाल तर दोन ओळींमधील अंतर पाच फूट आणि दोन रोपांमधील अंतर दोन फूट एवढे ठेवणे आवश्यक आहे. या अंतरावर जर तुम्ही याची लागवड केली तर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आहे.
जर या जातीच्या व्हरायटीची लागवड करताना मल्चिंग पेपरचा वापर केला, योग्य पद्धतीने मंडप बांधला, खत खाद्यांचा योग्य वापर केला, योग्य अंतरावर लागवड केली, पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले तर एकरी पाच हजार कॅरेट पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
तथापि उत्पादन हे सर्वस्वी तुम्ही केलेल्या नियोजनावर अवलंबून राहणार आहे. तुमचे नियोजन आणि हवामान पिकासाठी अनुकूल ठरले तर यातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.
या वरायटी पासून एवरेज 2200 कॅरेट पर्यंतचे उत्पादन मिळते पण काही शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून एकरी 5000 कॅरेट पर्यंतचे उत्पादन मिळवले असल्याचा दावा केला जात आहे. या जातीची बारा महिने लागवड केली जाऊ शकते.
आरडोर सीड्सची प्रतीक व्हरायटी : आरडोर सीड्सची प्रतीक ही व्हरायटी देखील अलीकडे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या जातीची फक्त उन्हाळ्यात लागवड केली जाते. या जातीपासून देखील एकरी पाच हजार कॅरेट पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. मात्र यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. टोमॅटोचा वाण विषाणूजन्य रोगासाठी मध्यम प्रतिकारक आहे.
आरडोर सीड्सची किरण व्हरायटी : Ardour Seeds इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची किरण हि वरायटी देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवून देणार आहे. यावर व्हरायटीपासून सुद्धा एकरी कमाल 5000 कॅरेट पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. टोमॅटोचा हा वाण टूटा रोगास आणि वायरसला कमी प्रमाणात बळी पडत असल्याचे आढळून आले आहे.